अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी

sakal_logo
By

36916
गडहिंग्लज : अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीचे निवेदन बाबासाहेब वाघमोडे यांना देताना दलित महासंघाचे पदाधिकारी.

अण्णा भाऊ साठे यांना
‘भारतरत्न’ देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : अण्णा भाऊ साठे मोठे लेखक होते. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘भारतरत्न’ द्यावा, यासह विविध मागण्या दलित महासंघातर्फे करण्यात आल्या. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बिनीचे शिलेदार म्हणून अण्णा भाऊ साठे आघाडीवर होते. त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्रातील जनमानस जागविला होता. महाराष्ट्रासह बाहेरही त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी अण्णा भाऊंना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. तसेच मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ची स्थापना करावी, सर्व मागासवर्गीय महामंडळांची कर्जे माफ करावीत, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी करावे आदी मागण्याही केल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष बाबूराव आयवाळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, तालुकाध्यक्ष सुरेश चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष परशुराम हुले, शंकर लोखंडे, विजय दावणे, उमेश साठे, मारुती अनावरे, विठ्ठल कांबळे, गजानन कासारीकर, पांडुरंग दावणे, आनंदा आयवाळे, सागर हेगडे, बाळकृष्ण मांग, प्रमोद मांग यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78476 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top