अतिक्रमण निमुर्लन पथक ‘ॲक्टीव्ह मोड’मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण निमुर्लन पथक ‘ॲक्टीव्ह मोड’मध्ये
अतिक्रमण निमुर्लन पथक ‘ॲक्टीव्ह मोड’मध्ये

अतिक्रमण निमुर्लन पथक ‘ॲक्टीव्ह मोड’मध्ये

sakal_logo
By

ich184,5.jpg

36970
36917

----------
अतिक्रमण निर्मूलन पथक ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये
प्रशासकांच्या आदेशानंतर कारवाई सुरू; इचलकरंजीत प्रमुख चौकांनी घेतला मोकळा श्‍वास
इचलकरंजी, ता. १८ ः महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या आदेशानंतर अतिक्रमण निर्मूलन पथक आज अॅक्टिव्ह झाले. शहरातील प्रमुख मार्गांवर फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण आज हटविण्यात आले. महापालिका झाल्यानंतर प्रथमच ही कारवाई केली. त्यामुळे शॉपिंग सेंटर रोडसह मुख्य मार्गावरील महत्त्वाच्या चौकांनी आज मोकळा श्वास घेतला.
शहरातील शॉपिंग सेंटर रोडवर फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. त्यांचा दुकानगाळेधारकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच या रस्त्यावर शाळा असल्यामुळे वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती. अन्य व्यावसायिकांनाही अडथळा निर्माण होत होता, मात्र राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर ठोस कारवाई होत नव्हती. आज मात्र शॉपिंग सेंटर रोडवरील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले. त्यामुळे हा रस्ता पूर्णतः खुला झाला असून, वाहतुकीलाही सुलभ झाला आहे.
जुनी पालिका परिसरात रस्त्यावरच भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढत चालले होते. रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते बसत असल्यामुळे तेथून धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागत होती. आज अतिक्रमण निर्मूलन पथकाने या परिसरात भाजीपाला विक्रेत्यांना मज्जाव केला. कालच या परिसरात एका कापड दुकानदाराने मंडपाचे केलेले अतिक्रमण दूर केले होते, तर काही दुकानदारांचे रस्त्यावरच ठेवलेले स्टॅन्ड फलक जप्त केले. यामुळे परिसर आता पूर्णतः खुला झाला आहे.
धान्य ओळ परिसरात रस्त्यावर धान्य विक्रेत्यांनी बाजार मांडला होता. यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई केली होती, पण पुन्हा त्यांनी अतिक्रमण केले होते. आज त्यांचे अतिक्रमण दूर केल्याने धान्य ओळीत जाणारा रस्ता खुला झाला आहे. दोन नंबर शाळेजवळील अतिक्रमणही आज दूर केले. राजर्षी शाहू पुतळा चौक व एएससी कॉलेज चौक फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. आज हे दोन्ही चौक अतिक्रमणमुक्त केले. या परिसरात बंद असलेले सात हातगाडे जप्त केले. यशवंत प्रोसेसनजीक मुख्य मार्गावरीलही अतिक्रमण आज दूर केले.
----------
कारवाईचे स्वागत
शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या मुख्य मार्गावर व शॉपिंग सेंटर परिसरातील अतिक्रमणामुळे रस्ते अत्यंत चिंचोळे झाले होते. वाहनधारकांना तेथून जाताना कसरत करावी लागत होती; मात्र आज ठोस कारवाई करीत अतिक्रमण दूर केले. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत केले. याबाबत सोशल मीडियातूनही या मोहिमेला बळ दिले.
------
कारवाईत सातत्याची गरज
यापूर्वीही अनेकवेळा अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबवण्यात आली; मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात मुख्य मार्ग व चौक सापडले होते. आजच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्यात आले आहेत; पण यापुढे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी महापालिका प्रशासनाकडून घेण्याची गरज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78479 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..