
मुक-कर्णबधिरांची राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा
लोगो-
नाशिकच्या वाटपडेला अजिंक्यपद
मूक-कर्णबधिरांची बुद्धिबळ स्पर्धा; भूषण पवार उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : कोल्हापूर जिल्हा मूक-कर्णबधिर असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र स्पोर्टस् कौन्सिल ऑफ डीफच्या मान्यतेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य मूक-कर्णबधिर निवड बुद्धिबळ स्पर्धा झाल्या. खुल्या पुरुष गटातील स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण पाच फेऱ्यांत झाली. यात अग्रमानांकित नाशिकचा विवेक वाटपडे याने साडेचार गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले, तर द्वितीय मानांकित नाशिकच्याच भूषण पवार याने चार गुणांसह उपविजेतेपद मिळविले.
चार गुण मिळवलेल्या मुंबईच्या दीपक खानोलकरला कमी टायब्रेक गुणामुळे तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. मसुरी फईम (पालघर), सागर घोडके (बीड) व सुयश सातपुते (कोल्हापूर) यांनी तीन गुण मिळवून टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे चौथे, पाचवे व सहावे स्थान पटकावले.
महिला गटात एकमेव इचलकरंजीच्या पूनम लढ्ढा सहभागी झाल्या होत्या, तर जुनिअर मुलांच्या गटात ही एकमेव जयसिंगपूरचा पियूष कदम याने भाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण ऑल इंडिया स्पोर्टस् कौन्सिल ऑफ डीफचे अशोक मोरे (अमरावती) महाराष्ट्र स्पोर्टस् कौन्सिल ऑफ डीफचे प्रशांत पिंपळे (पुणे) यांच्या हस्ते झाले. पंच भरत चौगुले, उत्कर्ष लोमटे, मनीष मारुलकर, उद्धव पन्हाळकर, सचिव अमेय गवळी, खजिनदार गौरव शेलार, सहसचिव तेजस मुरगुडे, राजू मुल्लाणी, धीरज कांबळे, जयश्री गवळी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78499 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..