पाच कोटीचे रस्ते रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच कोटीचे रस्ते रद्द
पाच कोटीचे रस्ते रद्द

पाच कोटीचे रस्ते रद्द

sakal_logo
By

शहरातील रस्ते दुरुस्तींचा
पाच कोटींचा निधी रद्द

कोल्हापूर, ता. १८ ः शहरात बहुतांश रस्त्यांची दाणादाण झाल्याने शहरवासीयांना प्रचंड त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अंबाबाई मंदिर परिसरासह शहरातील पाच वर्दळीच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत मंजूर झालेला पाच कोटींचा निधी नवीन सरकारने रद्द केला आहे. रस्ते विकासासाठी महापालिकेला मोठ्या प्रयत्नानंतर निधी मिळाला असताना तो रद्द झाल्यामुळे मोजक्या होणाऱ्या रस्त्यांनाही डांबरीकरणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अंबाबाई मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना खाचखळग्यातून ये-जा करावी लागत असल्याने महापालिकेने नगरविकास विभागाकडे प्रयत्‍न करून निधी मिळवला होता. मूलभूत सुविधांच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी ११ एप्रिलमध्ये मंजूर झाला. त्याची प्रक्रिया राबविण्याची तयारी केली जात असताना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. त्यानंतर नवीन आलेल्या शिंदे सरकारने जुन्या सरकारने घेतलेले काही निर्णय स्थगित केले, पुन्हा प्रस्ताव द्यायला लावून नवीन निर्णय घेतले तर काही निर्णय रद्द केले. यात महापालिकेला मंजूर झालेल्या पाच कोटींचा निधीही रद्द केला गेला.

चौकट
या रस्त्यांचे डांबरीकरण थांबणार
या रद्दच्या निर्णयामुळे मंदिराच्या उत्तरेकडील दोन रस्त्यांचे डांबरीकरण थांबले आहे. वसंत मेडिकल ते बाबूजमाल जैन मंदिर ते कपिलतीर्थ मार्केट तसेच गुजरी कॉर्नर ते रंकाळा स्टॅंड या रस्त्यांवर खड्डे आहेत. याशिवाय मंगळवार पेठ ते कळंबा फिल्टर हाऊस चौकातील वाहतुकीला पर्याय असल्याने हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने डांबरीकरण गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानजीकचा पाटीलवाडा ते ध्रुव रेसिडन्सी, न्यू शाहूपुरीतील अनुग्रह हॉटेल ते आयुक्त निवासस्थान निवडणूक कार्यालय हे मोठे रस्ते निधीसाठी मुकले. याशिवाय कलिकतेनगर, हरिओमनगर यासह प्रभाग क्रमांक ७३, ७४, ८०, ८१ येथील अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी मंजूर झाला होता. आता या रस्त्यांचे डांबरीकरण नवीन निधी आल्याशिवाय शक्य नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78551 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..