
इराणी खणीत तरुणाचा मृतदेह
इराणी खणीत तरुणाचा बुडून मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः इराणी खणीमध्ये बडून तरुणाचा मृत्यू झाला. आज त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना खणीमध्ये तरंगताना सापडला. नितीन आनंदा आठवले (वय २७, रा. आपटेनगर पाण्याच्या टाकीजवळ) असे या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. या घटनेची नोंद जूना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. शनिवारी (ता.१६) तो घरातून बाहेर पडला पण परत आला नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केली पण तो सापडला नाही. इराणी खणीमध्ये अग्निशन दलाच्या जवानांनी शोध घेतला असता आज त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांना आढळला. नितीनच्या पश्चात आई, वडिल, भाऊ असा परिवार आहे.
------------------------------------------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78649 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..