३३ बालके मुळ राज्यात परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३३ बालके मुळ राज्यात परत
३३ बालके मुळ राज्यात परत

३३ बालके मुळ राज्यात परत

sakal_logo
By

जिल्ह्यात आढळलेली
३३ बालके मूळ राज्यात
बालकामगारविरोधी मोहीम; जिल्हाधिकारी रेखावार यांचे प्रयत्न
कोल्हापूर, ता. १८ : बालकामगार शोधमोहिमेत आढळलेल्या ३३ बालकांना पश्‍चिम बंगाल व ओरिसा राज्यातील त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवले. बालकांना मूळगावी पाठवण्यासाठी तिकिटे उपलब्ध होत नसताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून राखीव कोट्यातून तिकीट देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे बालकांना त्यांच्या गावी पाठविणे शक्य झाल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यातील छापासत्रात ३३ बालके पश्‍चिम बंगाल व ओरिसा येथील असल्याने ती पुन्हा बालमजुरीच्या चक्रात अडकू नयेत, यासाठी मूळ जिल्ह्यातील पाठविण्याचा निर्णय बाल कल्याण समितीने दिले होते. यानुसार जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने योग्य नियोजन करून २३ बालके पश्‍चिम मिदनापूर (पश्‍चिम बंगाल) तर ८ पूर्व मिदनापूर (पश्‍चिम बंगाल) व २ बालकांना ओरिसा राज्यातील बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले.
बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, बाल कल्याण समितीचे सदस्य शिल्पा सुतार, अश्‍विनी खाडे, पद्मजा गारे, संजय मुंगळे, तसेच संस्था अधीक्षक, भीमराव कांबळे, अवधूत घाटगे, अक्षय जगताप, रामचंद्र पाटील, काळजीवाहक, शशिकांत कामत, दत्तात्रय नाईक, स्वप्निल शिर्के, सुरेश लोहार, पोलिस अंमलदार तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78654 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top