विषारी द्रव्य पिल्याने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विषारी द्रव्य पिल्याने मृत्यू
विषारी द्रव्य पिल्याने मृत्यू

विषारी द्रव्य पिल्याने मृत्यू

sakal_logo
By

36964

रेल्वेखाली उडी घेऊन
तारदाळमधील एकाची आत्महत्या
तारदाळ : हातकणंगले - तारदाळ दरम्यान रेल्वे रुळावर नर्मदे मळ्याशेजारी दुपारी बाराच्या सुमारास निवास बापू नर्मदे (वय ४५) यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबतची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतची माहिती अशी, निवास नर्मदे तारदाळ येथील सावंत गल्ली येथे राहत असून, आठ दिवस ते आजारी होते. आज सकाळी तब्येत ठीक आहे, असे घरात सांगून तो घरातून बाहेर पडला होता. दुपारी तारदाळ येथील रेल्वे ट्रॅकवर एकाचा मृतदेह दिसून आल्याने बराच काळ ओळख पटत नव्हती. मृतदेह स्वप्नील नरुटे यांनी रुळावरू बाजूला केल्यानंतर मृतदेह निवास नर्मदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घटना समजताच घटनास्थळी नातेवाईकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.

विजेच्या खांबावरून पडून युवकाचा मृत्यू
गडहिंग्लज : येथील अर्बन कॉलनीत विजेचा धक्का बसल्याने खांबावरून पडून युवकाचा मृत्यू झाला. श्याम गोविंद मेश्राम (वय २७, रा. यवतमाळ) असे मृत युवकाचे नाव आहे. आज सायंकाळी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. श्याम एका कंत्राटदाराकडे २०१३ पासून कामाला आहे. येथील अर्बन कॉलनीत एका नवीन अपार्टमेंटला वीज जोडणी देण्यासाठी विजेचे नवे खांब उभारणीचे काम सुरू होते. हे काम करताना श्यामला विजेचा धक्का बसल्याने तो खांबावरून कोसळला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची येथील पोलिसात नोंद झाली आहे.

पुरुषाला केली दोन महिलांनी मारहाण
इचलकरंजी : येथील गांधी पुतळा चौकात आर्थिक देवाणघेवाणीतून दोन महिलांनी पुरुषाला मारहाण केली. ही घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ही माहिती समजताच गावभाग पोलिसांसह शहर महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी दाखल झाल्या. गांधी पुतळा चौकात रस्त्याच्या बाजूला दोन महिला आणि एक पुरुष बोलत होते. पैशाच्या देवाणघेवाणीतून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यावर घरी बसून चर्चा करूया, असे सांगत तिघेजण निघाले; मात्र अचानक निघून जाताना त्याने दोन महिलांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही संतप्त महिलांनी त्याला चोप देण्यास सुरुवात केली. यातून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला रोखून धरले. या प्रकाराने चौकात नागरिकांसह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी गर्दी केली. घटनास्थळी गावभाग पोलिस व महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी दाखल झाल्या.

इराणी खणीत तरुणाचा बुडून मृत्यू
कोल्हापूर ः इराणी खणीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाला. आज त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना खणीमध्ये तरंगताना सापडला. नितीन आनंदा आठवले (वय २७, आपटेनगर पाण्याच्या टाकीजवळ) असे तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता होता. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन खासगी कंपनीत नोकरी करत होता. शनिवारी (ता. १६) तो घरातून बाहेर पडला; पण परत आला नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली; पण तो सापडला नाही. इराणी खणीमध्ये अग्निशन दलाच्या जवानांनी शोध घेतला असता आज त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. नितीनच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.


पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ
उत्तूर ः वडकशिवाले, हालेवाडी (ता. आजरा) येथे दोन दिवस पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. माणसांसह जनावरांवर हल्ले केले. कुत्र्याचा शोध नागरिक घेत आहेत. आनूबाई केरबा पाटील शेतात जात असताना कुत्र्याने मागून येऊन त्यांच्या पायाचा लचका तोडला. त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हालेवाडी येथील संतोष वसंत येजरे यांच्या पायाला कुत्र्याने चावून जखमी केले. आण्णापा आपके यांच्या म्हशीला व शामराव पाटील यांच्या चार जनावरांवर कुत्र्याने हल्ला केला. कुत्रे मासेवाडीच्या दिशेने पळून गेले. जाताना हालेवाडी तिठ्यावरील कुत्र्याच्या दोन पिलांवर हल्ला केला.

विषारी द्रव्य प्यायल्याने एकाचा मृत्यू
कोल्हापूर ः विषारी द्रव्य प्यायल्याने विनोद ज्ञानेश्वर ओव्हळ (वय ४०, रा. पाचगाव, ता. करवीर) यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. सीपीआर चौकीमध्ये नोंद असलेल्या माहितीनुसार, विनोद यांनी शनिवारी (ता.१६) कोगे येथील शेतामध्ये विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78656 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top