कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

सतीश माळवी ः सकाळ वृत्तसेवा

बाजार भोगाव, ता. १९ ः पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका... पूर्व पन्हाळा व पश्चिम पन्हाळा अशा दोन विभागात विभागला जातो... पूर्व पन्हाळ्यात कमी पाऊस तर पश्चिम पन्हाळा भाग हा दुर्गम व सह्याद्रीच्या डोंगर रांगेत उभा कोसळतो धो धो पाऊस... हा धो धो पाऊस झेलणाऱ्या गावांचे आणि तेथील ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन, त्यांची जीवनशैली आपण पाऊश झेलणारी गावं या मालिकेत वाचत त्यांचं जगणं अनुभत आहोत. आज आपण अशाच सह्याद्रीच्या डोंगररांगेत वावरणाऱ्या आणि कोलिक, पडसाळी, काझिर्डा या परिसरातील रहाटगाडगं अनुभवणार आहोत.
पडसाळी, कोलीक, वाशी परिसरात पडणारा पाऊस म्हणजे पावसाचे माहेरघरच होय. सह्याद्रीचे कडे, कोकणातील घाटमाथा व काजिर्डा घाटातून येणारे थंडगार वारे, धुके व मुसळधार पाऊस हे नित्याचे... एकवेळ पन्हाळा गडावर पावसाळ्यात ऊन दिसेल; पण पडसाळी येथील दुर्लक्षित असणाऱ्या मुढागड व परिसरात जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यावर पुढील चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही, असा पाऊस येथे पडतो, असे येथील वयोवृद्ध सांगतात. या परिसरात पोंबरे व पडसाळी दोन लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. याठिकाणी पर्जन्यमान केंद्राची सोय नसली तरी येथील पाऊस हा गगनबावडा तालुक्याच्या ठिकाणी पडत असतो.
बाजार भोगावहून पडसाळीकडे निघताना जांभळी नदीच्या काठावरून जात असताना एका बाजूला दाट झाडी तर दुसऱ्या बाजूस ऊस, भात शती च्या कामात गुंग असलेली शेतकरी दिसतात. जस जसे काळजवडे, पिसात्री, मानवाड गावे सोडत पुढे पडसाळीच्या दिशेला जात असताना वाटे चाफेवाडी फाट्यावर राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा लागतो येथे क्षणभर थांबून दर्शन घेतले व पडसाळीच्या दिशेला जाताच पावसाची तीव्रता जाणवते.
हा परिसर घनदाट जंगल व विविध वनसंपदेने नटलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोलिक, मानवाड, गोठणे, चाफेवाडी, पडसाळी, वाशी या परिसरात राजर्षी शाहूंचे वास्तव्य असायचे. त्यांनी हत्तींच्या संवर्धनासाठी परिसरात चर खुदाई करण्याचा बेत आखला. एका बाजूला गगनबावडा, मध्यभागी पन्हाळा तर दुसरीकडे शाहूवाडी तालुक्याची हद्द. पश्चिमेला कोकणातील राजापूर तालुक्याच्या हद्दीतील खोल दरी असणारा कडा. त्यामुळे या हद्दीतून हत्ती बाहेर जावू नयेत यासाठी चर खोदाई केली. त्यासाठी पन्हाळा तालुक्यातील गोठणे, चाफेवाडी, कोलीक, पडसाळी, मानवाड या गावांना पोंबरे येथे विस्थापित करण्यात आले. गगनबावडा तालुक्यातील कोदे, पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथील मुढागड परिसर, गोठणे, मानवाड ते शाहूवाडी तालुक्यातील बर्की - इजोली इथपर्यंत ही चर खोदाई केली. त्याच्या धूसर होत चाललेल्या खुणा आजही जाणवतात.

कोट
पन्हाळा तालुक्यातील पडसाळी व राजापूर तालुक्यातील काजिर्डे गाव. दोन्हीही गावात एकमेकांचे पाहुणे आहेत. जंगलातून पायवाटेने प्रवास करत ग्रामस्थांचे येणे-जाणे असते. तळकोकणात जाण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे काजिर्डा घाट असून हा घाट फोडल्यावर निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येईल व तळकोकणात जाण्यासाठी इतर घाटापेक्षा जवळचा मार्ग होईल.
दत्तात्रय तायाप्पा पाटील, ग्रामस्थ, कोलिक (ता. पन्हाळा)

चाफेवाडी फाट्यावर शाहू महाराजांचा पुतळा असून येथे सुशोभिकरणाची गरज आहे. सध्या हा पुतळा चबुतऱ्यावर उभा असला तरी सभोवती झुडपे वाढल्याने रस्त्यावरुन जाता जाता पुतळ्याचे दर्शन घेण्यास अडथळा होत आहे.
पवन डोंब, पर्यटक, पोर्ले तर्फ बोरगाव

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78681 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..