राजेश खन्ना स्मृतीदिन मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश खन्ना स्मृतीदिन मैफल
राजेश खन्ना स्मृतीदिन मैफल

राजेश खन्ना स्मृतीदिन मैफल

sakal_logo
By

37243
37245
जय जय शिवशंकर...!
राजेश खन्ना स्मृतीदिनी रंगली हाऊसफुल्ल मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः ‘जय जय शिवशंकर, कॉंटा लगे ना कंकर, के प्याला तेरे नाम का पिया....‘ अशी एकाहून एक सरस गीते सादर होत होती आणि त्यावर ताल धरताना प्रत्येक जण सत्तरच्या दशकात जात होता...राजर्षी शाहू स्मारक भवनात ही अनोखी आणि हाऊसफुल्ल मैफल काल कोल्हापूरकरांनी अनुभवली. निमित्त होते, येथील हृदयस्पर्श संस्थेच्या वतीने आयोजित ‘वो शाम कुछ अजीब थी...‘ या मैफलीचे. ‘अकेले है चले आओ...‘, ‘जिंदगी के सफर मे..‘, ‘रूप तेरा मस्ताना...‘, ‘चिंगारी कोई भडके...‘, ‘नदिया से दरिया...‘, ‘हम दोनो दो प्रेमी...‘, ‘सुनो चंपा सुनो तारा..‘ अशी तब्बल अठ्ठावीस गीते मैफलीत सादर झाली. ‘वो शाम कुछ अजीब थी..‘ या गीताने मैफलीची सांगता झाली. डॉ. सतिश पत्की, डॉ प्रा.भारत खराटे, उद्योजक महावीर गाठ, बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, डॉ.संजय देसाई, डॉ. पी. एन. कदम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, उपशहर प्रमुख विशाल देवकुळे, राजाराम बापू बँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील सावंत, निवृत्त पोलिस अधिकारी आर. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पदमाकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. मैफलीला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद मिळत असून येत्या काळातही ती अधिक व्यापक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गायिका नम्रता सुतार, हर्षदा परीट, ऋचा गावंदे, पद्मिनी कापसे, वसंतराव अर्दाळकार, घनःश्याम वेंगुर्लेकर, वैभव पोतदार, संतोष धुमाळ, प्रल्हाद पाटील, मिलिंद पाटील आदींचा स्वरसाज होता. विक्रम पाटील, प्रकाश साळोखे, सचिन देसाई, सचिन जाधव, ऋतिक कुरणे, झंकार सुतार, विकी पाटील यांची साथसंगत होती.

राजेश खन्ना
यांच्या आठवणींना उजाळा
डॉ. सतीश पत्की यांनी राजेश खन्ना यांची झालेली भेट आणि त्यानंतरचा त्यांचा सहवास अशा विविध आठवणींना उजाळा दिला. निवेदक प्रल्हाद पाटील यांनी राजेश खन्ना यांचा एकूणच प्रवास उलगडला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78698 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..