
संक्षिप्त
37066
कमांडो पथक आपत्ती
व्यवस्थापनासाठी सज्ज
कोल्हापूर ः शहर परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ३५ कमांडोंचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. मराठा कमांडो सिक्युरिटी, इंटेलिजन्स, मॅनपॉवर फोर्स लिमिटेड, एमसीएसएफ वेलफेअर फाउंडेशन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा कमांडोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूनम पाटील, अनिकेत नाईक, सुरेश कांबळे यांच्यासह सहकार्याने हे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
संयुक्त ताराबाई पार्क
मंडळाची बैठक
कोल्हापूर ः ताराबाई पार्क येथील संयुक्त ताराबाई पार्क मंडळाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. संस्थापक शुभम सावर्डेकर यांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश वाटप करण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. अध्यक्ष सैफ शेख यांनी गणेशोत्सवासंबंधी माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सिद्धेश खाणोलीकर, खजानिस सौरभ भूतडा, सचिव प्रसन्न वाझे आदी उपस्थित होते.
37067
सातार्डेकर, सुतार यांचा सत्कार
कोल्हापूर ः सी. ए. परीक्षेतील यशाबद्दल ऐश्वर्या सातार्डेकर, तर दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण संपादन केल्याबद्दल वैभवी सुतार यांचा सुतार-लोहार समाजोन्नती संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष व्ही. डी. लोहार, राजेंद्र सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिगंबर लोहार, महिला जिल्हाध्यक्ष मालती सुतार, राधा मेस्त्री, अश्विनी सुतार, रुपाली सातार्डेकर, सचिन सुतार, शहराध्यक्ष अमित सुतार, दीपक सुतार, युवराज सुतार, सुनंदा मंडपाळकर, सुखदेव सुतार, प्रल्हाद लोहार, अनिल सुतार, श्रद्धा सुतार, सचिन लोहार आदी उपस्थित होते.
-------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78701 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..