घरफोडीचा विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीचा विषय
घरफोडीचा विषय

घरफोडीचा विषय

sakal_logo
By

चोरांचे कार्टून

बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर
सीसीटीव्हींना बगल; घरफोडीच्या प्रकारात वाढ; पोलिसांपुढे आव्हान
राजेश मोरे ःसकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः बंद घरांच्या दरवाजाला लावलेल्या कुलुपावर कटावणीचा घाला घालत चोरटे हात साफ करू लागलेत. ते सीसीटीव्हीला बगल देत शहरातील मध्यवस्तीसह जिल्ह्यात आपले धाडस दाखवू लागलेत.
पावसाळ्यात २०१९ व २०२१ मध्ये महापूर आला होता. घरात पाणी आल्याने अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. अशा पुरातील बंद घरे चोरट्यांनी टार्गेट केली होती. यावर्षी पूरपरिस्थिती शहर परिसरात निर्माण झालेली नाही, तरीही बंद घरे, दुकाने आज सुरक्षित आहेत, याची हमी देता येत नाही. कारण गेल्या काही दिवसांत शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरात घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. घराला कुलूप लावून बाहेरगावी जाण्यापूर्वी मौल्यवान वस्तू लॉकर्समध्ये ठेवा, शेजाऱ्यांसह स्थानिक पोलिस ठाण्याला याची माहिती द्या आदी संदर्भात पोलिस प्रशासनाकडून वारंवार प्रबोधन केले जाते. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक आहे.
पावसामुळे पाण्याच्या पातळीवर पोलिसांचे लक्ष आहे. नदी, ओढा, तलावांसह पाणी येणाऱ्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात आहे. पोलिसांची गस्तही सुरू आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही बसविले आहेत. शहरातील मुख्य चौकांसह शहरात प्रवेश करणारे सर्व मार्गावरही या सीसीटीव्हींची नजर आहे. त्याचबरोबर अनेक घरांत आणि विविध संस्था, मंडळांच्या पुढाकारातून गल्लीबोळात सीसीटीव्ही बसविले आहेत, तरीही चोरट्यांनी शहरासह जिल्ह्यात घरफोड्या करत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
------

आठवडाभरातील घरफोडीचे चित्र

*ठिकाण* चोरीला गेलेला ऐवज
*‘सीबीएस’जवळील मोबाईल दुकान * १ लाख ३८ हजार
*वसगडेत चार दुकाने फोडली * ७५ हजार
*रुकडीत रात्रीत दोन घरफोड्या *२ लाख
*मोरेवाडीतील बंद बंगला फोडला *१० तोळे सोन्याचे दागिने
*नवीन वाशीनाका प्राध्यापकांचा बंगला फोडला * ६ लाखांचा ऐवज
*विक्रमनगरात ज्वेलर्स दुकानात चोरी *२ लाख १० हजारांचे दागिने
-----------------
एलसीबीसह डीबी पथके
चार्जिंग करण्याची मागणी
गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र असे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शोधपथक (डीबी) आहे. ही पथके चार्जिंग करून घरफोड्यांचा तातडीने बंदोबस्त करा, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78786 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..