
साठवण तलावासाठी बाधीत जमिनीचा मोबदला द्या
37132
शिनोळी : आमदार राजेश पाटील यांना निवेदन देताना इसापूर ग्रामस्थ.
साठवण तलावासाठी बाधित
जमिनीचा मोबदला द्या
इसापूर ग्रामस्थांची मागणी, आमदार राजेश पाटील यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १९ : इसापूर (ता. चंदगड) येथे साठवण तलाव बांधला असून यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. त्यांचे योग्य मूल्यांकन करून मोबदला द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमदार राजेश पाटील यांना त्यांनी मागणीचे निवेदन दिले.
गावानजीक मालकी जमिनीमध्ये साठवण तलावाचे बांधकाम केले आहे. यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांचे मूल्यांकन योग्य झाले नसल्याची तक्रार आहे. पाटबंधारे खात्याशी झालेल्या चर्चेवेळी दरासंदर्भात जी बोलणी झाली व त्यांनी जो दर देण्याची हमी दिली होती ती अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. यामध्ये आमदार या नात्याने आपण लक्ष घालून योग्य मूल्यांकन करावे व जमिनीचा योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर संदीप गवस, देवू गवस, भास्कर गवस, पांडुरंग गवस, नारायण गवस आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78788 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..