शाळा बस वाहतूक धोकादायक : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा बस वाहतूक धोकादायक :
शाळा बस वाहतूक धोकादायक :

शाळा बस वाहतूक धोकादायक :

sakal_logo
By

37146

कोट येणार आहे

विद्यार्थी वाहतूक धोकादायक
पालकांचा जीव टांगणीला; कोंबड्या भराव्या तशी अवस्था, नियम, अटी, कायद्याचा फज्जा

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : ज्या रिक्षा तीन ते चार प्रवाशांना वाहतुकीची परवानगी आहे. अशा रिक्षात १५ ते २० विद्यार्थांची वाहतूक करायची. ज्या बसमध्ये २० ते २२ विद्यार्थी वाहतुकीला परवानगी आहे. अशा बसमधून कोंबड्या भरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक होत आहे. कायदा, नियम आणि मुलांची सुरक्षितता धाब्यावर बसवून विद्यार्थी वाहतूक सुरू आहे, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत पालकांतून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व शाळांत खासगी बसमधून विद्यार्थांची वाहतूक केली जाते. शाळा व्यवस्थापनाकडून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केली जाते. ज्या बसमध्ये २० ते २२ विद्यार्थांना परवानगी आहे, अशा बसमध्ये ३० ते ३५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात.
काही शाळांत एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थांच्या मांडीवर बसून प्रवास करतात. अशा वाहतुकीमुळे विद्यार्थांचा जीव धोक्‍यात घातला जातो. एका नावाजलेल्या शाळेच्या पालक सभेत अनेक महिलांनी बस वाहतुकीसाठी भरमसाट फी घेता मग त्यांना सुरक्षित प्रवास का देत नाही, अशी विचारणा केली. याला उपस्थित पालकांनी सहमती दर्शवत एका सीटवर जेवढी मर्यादा आहे, तेवढेच विद्यार्थी बसवावे, अशी मागणी केली; मात्र याला फारसा प्रतिसाद संबंधितांनी दिला नाही.
पन्हाळा तालुक्‍यातील एका शाळेची स्कूलबस उसाच्या शेतात पलटी होऊन विद्यार्थी जखमी झाले आहेत. याचा वाहतूक पोलिस धडा घेणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.


* विद्यार्थी नियम व अटी :
*बसमध्ये प्रशिक्षित चालक, पुरुष, महिला परिचर हवेत
* बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करू नये
*प्रथमोपचार संच व इतर साहित्य आवश्‍यक
* खिडक्‍यांमध्ये तीन आडव्या दांड्या असाव्यात
* यामधील अंतर ५ सेमीपेक्षा जास्त नसावे
*जेवणाचे डबे, पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
*बस चालू असताना दरवाजे बंद असावेत
*मोठ्या मुलांनी मागील बाजूस बसावे
* वेग मर्यादा ४० ते ५० असावी
......

एका-एका व्हॅनमध्ये १७ ते १८ विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे वारेमाप पैसे देऊनही मुलांचे हाल होत आहेत. यावर शाळा व्यवस्थापनाने मर्यादित वाहतूक करावी.
- अभिजित जाधव, पालक.
..........

एका-एका बसमध्ये विद्यार्थी एकमेकांच्या मांडीवर बसून येतात. हा जीवघेणा प्रवास थांबला पाहिजे. शाळा सांगतील तेवढे पैसे देतो तरीही धोकादायक वाहतूक कशासाठी सुरू आहे.
-दीपक पाटील, पालक.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78804 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..