
विमा कवच
पिक फोटो
भाताला हेक्टरी ४२ हजारांचा विमा
३१ जुलैअखेर मुदत : उसाचा समावेश नसल्याने अल्प प्रतिसाद
सकाळवृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत उसाचा समावेश नाही. त्यामुळे जिल्ह्यात या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद नाही; मात्र भात, खरीप ज्वारी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन पिकांसाठी ही योजना लाभदायक आहे. शेतकऱ्यांना भात पिकांचे ७० टक्के नुकसान झाल्यास ८४० रुपयांत तब्बल ४२ हजारांचा विमा कवच मिळणार आहे. ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. तत्काळ हा विमा घेतला जावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून केली आहे.
जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन या पिकांना विमा कवच दिले जात आहे. नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधित नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसात झालेल्या नुकसानीबद्दल विमा संरक्षण दिले जाते.
* पीक विम्यासाठी आवश्यक कागदपत्र :
- सातबारा, ८ अ उतारा
- बॅंक पासबुक झेरॉक्स
- आधारकार्ड झेरॉक्स
- स्वयंघोषणापत्र
....
* पीक विम्यात समावेश नसलेली गावे :
खरीप ज्वारी : कळे, पडळ, बाजारभोगाव (ता. पन्हाळा ), करवीर तालुका : सांगरूळ, बीड, शिरोली दुमाला, बालिंगा. शिरोळ तालुका : कुरुंदवाड, दत्तवाड. राधानगरी, गगनबावडा, भुदरगड व चंदगड.
* सोयाबीनसाठी पन्हाळा तालुक्यातील कळे, पडळ, बाजारभोगाव, कोतोली. शाहूवाडी, राधानगरी व गगनबावडा.
--
* पिकांचे ७० टक्के नुकसान झाल्यानंतर प्रतिहेक्टरी मिळणारी रक्कम व त्याचा हप्ता:
पीक* हप्ता* संरक्षित रक्कम (मिळणारी)
भात*८४०*४२ हजार
खरीप ज्वारी*५४०*२७ हजार
नाचणी*४००*२० हजार
भुईमूग*७६०*३८ हजार
सोयाबीन*९८०*४९ हजार
...
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78820 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..