माथाडी वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथाडी वाद
माथाडी वाद

माथाडी वाद

sakal_logo
By

37217


वारणी-माथाडी वादात काम बंद
शिवीगाळीचा आरोप; मार्केट यार्डात कांदा बटाटा माल भरण्याचे काम ठप्प
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः शाहू मार्केट यार्डातील कांदा बटाटा बाजारपेठेत वारणी कामगाराने माथाडी कामगाराला शिवीगाळ केल्याचा आरोप करत माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कांदा बटाटा बाजार पेठेत सौदे झाले तरी मालाची भरणी उतरणीची काम होऊ शकले नाही.
कांदा बटाटा विभागात परगावावरून आलेल्या कांदा, तसेच बटाट्याची पोती गाडीतून दुकानात उतरणे व दुकानातून गाडीपर्यंत माल पोहोचवण्याचे काम माथाडी कामगार करतात, तर वारणी कामगार ही गाडीत भरलेला माल गाडीच्या फाळक्या (दरवाजा) पर्यंत आणून देण्याचे काम करतात. त्यांचे काम हे बहुतांश गाडीतील मालापुरतेच चालते.
या दोन्ही घटकांनी आपल्याला काम जास्त मिळावे, तसेच मजुरीही जास्त मिळणेसाठी प्रयत्न सुरू असतो. यातून काल सोमवारी एका वारणी कामगार तरुणाने वयस्कर माथाडी कामगाराला शिवी दिल्याचा आरोप माथाडी कामगारांनी केला. त्यानंतर त्यांनी काम बंद आंदोलन केले, त्यानंतर माथाडी मंडळाचे अधिकारी व बाजार समिती सचिव यांनी बैठक घेऊन दोन्ही बाजू म्हणणे जाणून घेत वाद मिटवला होता. त्यानुसार आज मंगळवारी सकाळी कांदा बटाटा बाजारपेठेतील कामकाज सुरू झाले एक हजार कांदा पिशव्यांचे सौदे सुरू झाले आणि काही वेळात माथाडी कामगारांनी कालचाच मुद्दा पुन्हा उपस्थित करून काम बंद आंदोलन केले.

कोट
वारणी कामगारांची नोंदणी करू नये, असा नियम असताना माथाडी मंडळाने वारणी कामगारांची नोंदणी करून घेतली आहे. वारणी कामगारांकडून माथाडी कामगारांना त्रास देण्यात येतो. यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. वारणी कामगार जास्त पगार घेतात. तुलनेत माथाडींना अनेकदा काम मिळत नाही, असे असताना वारणी कामगार माथाडी कामगारांना शिवीगाळ करीत होते, हे योग्य नाही. त्यामुळे शिवीगाळ केलेल्या वारणी कामगाराला निलंबित करावे, तोपर्यंत काम सुरू होणार नाही.
- बाळासाहेब चौगुले, अध्यक्ष माथाडी कामगार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78821 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top