निवडीच्या बातम्या/अन्य कॉमन बातम्या एकत्रितपणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडीच्या बातम्या/अन्य कॉमन बातम्या एकत्रितपणे
निवडीच्या बातम्या/अन्य कॉमन बातम्या एकत्रितपणे

निवडीच्या बातम्या/अन्य कॉमन बातम्या एकत्रितपणे

sakal_logo
By

फोटो : 37171 (दुर्वास कदम), 37172 (विजय चरापले), 37173 (डॉ. गुरुदत्त म्हाडगुत), 37174 (रामेश्‍वर पतकी)

हुतात्मा क्रांती संस्थेच्या
अध्यक्षपदी दुर्वास कदम
कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी दुर्वास कदम यांची निवड झाली. वार्षिक कार्यकारिणी निवडीच्या बैठकीत संस्थापक किसनराव कल्याणकर यांनी २०२२-२३ साठी कार्यकारणीची घोषणा केली. सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. श्री. कल्याणकर यांनी ‘क्रांती ज्योती’चे ४४ वे वर्षे असून सुवर्णमहोत्सवासाठी कार्यकारिणीने समाजोपयोगी उपक्रम घ्यावेत, असे आवाहन केले.
कार्यकारिणी अशी : अध्यक्ष- दुर्वास कदम, उपाध्यक्ष- विजय चरापले, कार्याध्यक्ष- रामेश्वर पतकी, सचिव डॉ. गुरुदत्त म्हाडगूत, खजानीस लक्ष्मण मोहिते, प्रसिध्दी प्रमुख- जयकुमार शिंदे, कार्यालयप्रमुख- विजय जाधव, ऑडीटर- सुनील हंकारे, कायदा सल्लागार- विनायक मोहिते-पाटील, हिशोब तपासणीस व कर सल्लागार- युवराज तेली. सदस्य- किशोर यादव, अर्जुन शिंदे, किरण भोसले, मुसाभाई शेख, सुमित खानविलकर, धनाजी घोरपडे, अविनाश पोवार, प्रशांत बरगे, ज्येष्ठ सल्लागार- संभाजीराव जगदाळे, बापू साळोखे, बाबा सावंत, शिवाजीराव ढवाण.ताळेबंदाच्या वृत्तांताचे वाचन मुसाभाई शेख यांनी केले. अनिल कोळेकर यांनी स्वागत केले.

‘रोटरी’तर्फे कराओके गायन स्पर्धा
कोल्हापूर : मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब ऑफ करवीरतर्फे कराओके स्पर्धेचे आयोजन ३१ रोजी केले आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे १०,०००, ५,०००, ३,०००अशी रोख बक्षिसे, पारितोषिके प्रदान करण्यात येतील. स्पर्धा ३ फेऱ्यामध्ये होणार असून पहिली फेरी ऑनलाइन आहे. दुसरी आणि तिसरी फेरी ही रोटरी समाज सेवा केंद्र, नागाळा पार्क येथे होईल. स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क असून रोटरीच्या सामाजिक कार्यासाठी ते वापरण्यात येणार आहे. इच्छूकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष उदय पाटील आणि सचिव स्वप्निल कामत यांनी केले आहे.


फोटो : 37178 महेश शिंदे
37179 प्रविण अतिग्रे

महेश शिंदे अध्यक्षपदी
कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिलबहार तालीम मंडळ येथे झाली. अमित फाळके सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेत २०२२-२३ साठी मोहरम आणि गणेश उत्सव कार्यकारणी नियुक्ती केली. कार्यकारणी अशी : अध्यक्ष- महेश शिंदे, उपाध्यक्ष-प्रविण अतिग्रे, सचिव- सार्थक शिंदे, सहसचिव- आकाश वंशे, खजानिस- अमोल बलुगडे, सह खजानीस- अक्षय शिंदे, सदस्य असे : शुभम माळी, ऋशिकेष भोसले, पवन कळगे, कुणाल फाळके, धनराज इंगवले, ऋत्विक तोरस्कर, महेश तोडकर, संकेत खोत, मेघराज पवार,अर्जुन चव्हाण, अथर्व भोसले.


37188 संजय पोतदार
37189 पांडुरंग पोतदार

संजय पोतदार अध्यक्षपदी
कोल्हापूर : विश्वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड झाली. अध्यक्षपदी संजय पोतदार, उपाध्यक्षपदी पांडुरंग पोतदार यांची निवड झाली.
अनिष पोतदार (सचिव), विनोद सोनार (खजानिस), सदस्य असे : जीवन सोनार, अरविंद पोतदार, महादेव पोतदार, अशोक पोतदार, कपिल पोतदार, प्रविण पोतदार, दिपक पोतदार, अनिल पोतदार, शिवाजी पोतदार.


37203 (सोमेश लाहूंडे), 37204 (अल्केश कवाळे)

सोमेश लाहुंडे अध्यक्षपदी
कोल्हापूर : श्री हनुमान तालीम मंडळ गणेशोत्सव कार्यकारिणी सदस्य ठरविण्यासाठी श्री हनुमान तालीम मंडळ, सांस्कृतिक हॉल येथे शिवाजीराव आनंदराव कवाळे यांचे अध्यक्षतेखाली समाजाची बैठक झाली. ज्येष्ठ नागरिक कमिटीचे पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकारिणी अशी : हर्षल ऊर्फ सोमेश लाहुंडे (अध्यक्ष), अल्केश कवाळे (उपाध्यक्ष), सुजित कवाळे (खजानीस), आशिष कवाळे (सचिव), सदस्य असे : ईगल दाभाडे, अनुप आवळे, संदेश कवाळे, सुमित दाभाडे, साहिल कवाळे, आकाश कांबळे.


कृषी उत्पादनांवरील जीएसटीची
दरवाढ रद्द करा : वंचित आघाडी
कोल्हापूर : करमुक्त स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पानांवरील लादलेल्या जीएसटीमुळे महागाईत वाढ, अवाजवी दरवाढ झाली. त्यामुळे दरवाढ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांना दिले. वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष प्रा. विलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. जिल्हाध्यक्षा रविना कांबळे, शहराध्यक्ष मिलींद पोवार, जिल्हा महासचिव महादेव कुंभार, महासचिव सिध्दार्थ कांबळे, महासचिव मल्हार शिर्के, शहराध्यक्ष पांडुरंग मानकापुरे, अॅड. महेश कांबळे, वैशाली कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय कट्टी, तालुका अध्यक्ष आशापक देसाई, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, श्रीनिवास कामत आदि उपस्थित होते. प्रधानमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त असताना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून १८पासून आता अनेक दैनंदीन वस्तूसाठी नागरीकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

फक्त फोटो : 37208
कोल्हापूर : कुशलभाई गाला यांचे चॅनल पॅकेजिंगतर्फे तयार केलेली उत्पादने (डिस्पोजेबल) होलसेल विक्रीच्या दालनाचे उद्‌घाटन रतिलाल भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी वैशाली भंडारी, राकेश बोरा, चंद्रकांत कागले, अनिल महाजन, संदिप मकोटे, प्रशांत घाटगे, स्नेहलता माने.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78837 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..