
निधन वृत्त
००९८५
इंदुबाई पोवार
सांगवडेवाडी ः येथील इंदुबाई आनंदा पोवार (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती व दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २१० आहे.
३०३२
धनपाल पाटील
घुणकी : किणी (ता. हातकणंगले) येथील धनपाल पायगोंडा पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. डॉ. ए. पी. पाटील यांचे बंधू होत.
ते वडगांव - वाठार टेंपो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या मागे भाऊ, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २०) आहे.
१७१०
सचिन शेळके
बांबवडे ः डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सचिन सदाशिव शेळके (वय ३९) यांचे निधन झाले. ते गोकुळमध्ये सुपरवाझर होते. त्यांच्या मागे आई, वडील पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २१) आहे.
०२४०६
बाबूराव पाटील
माजगाव : निटवडे (त. करवीर) येथील बाबूराव दिनकर पाटील (वय ७४) यांचे निधन झाले.
शालाबाई पाटील
कळे : येथील शालाबाई धोंडीराम पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बहीण, भाऊ, भाचे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २०) नांदगाव (ता. शाहूवाडी) येथे आहे.
०२२७३
तानाजी कांबळे
सिद्धनेर्ली : व्हन्नूर (ता. कागल) येथील कोतवाल तानाजी दिनकर कांबळे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२१) आहे.
०१५९२
तानाबाई कांबळे
हळदी : जैताळ (ता. करवीर) तानाबाई शामराव कांबळे (वय ७०) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.
०१९१०
भागीरथी निकम
कसबा बीड : कोगे (ता. करवीर) येथील भागीरथी महादेव निकम (वय ७९) यांचे निधन झाले. एसटीचे कर्मचारी तानाजी निकम यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २०) सकाळी आहे.
06965
शिवकुमार पाटील
घुणकी : किणी (ता. हातकणंगले) येथील हायस्कूलचे निवृत्त पर्यवेक्षक शिवकुमार रामचंद्र पाटील उर्फ एस. आर. पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, सुना नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे गुरुवारी (ता. २१) मूळ गाव आळसंद (ता. विटा) येथे आहे.
02147
निलाबाई देशमुख
खोची : नरंदे येथील निलाबाई आण्णासाहेब देशमुख (वय ८५) यांचे निधन झाले. नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२१) आहे.
06967
शिवलिंग कारंडे
घुणकी : जुने पारगाव (ता. हातकणंगले) शिवलिंग गुरुपाद कारंडे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.२०) आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78851 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..