दोन्ही खासदारांच्या निवासस्थावर बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन्ही खासदारांच्या निवासस्थावर बंदोबस्त
दोन्ही खासदारांच्या निवासस्थावर बंदोबस्त

दोन्ही खासदारांच्या निवासस्थावर बंदोबस्त

sakal_logo
By

37210

मंडलिक, माने यांच्या निवासस्थानी बंदोबस्त
शहर पोलिस उपअधीक्षक चव्हाण; शिवसेनेतील उलथापालथीनंतर पोलिस दल सज्ज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी शस्त्रधारी बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील आदेशापर्यंत बंदोबस्त कायम ठेवण्यात येईल, असे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज शिवसेनेच्या १२ खासदारांनी भेट घेतली. यामध्ये खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांचाही समावेश होता. त्यामुळे दोन्ही खासदारांचा शिंदे गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. शिवसेनेत बंडखोरीचा मुद्दा काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा पोलिस दलाने या दोन्ही खासदारांच्या निवासस्थानावर शस्त्रधारी बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा बंदोबस्त रुईकर कॉलनी आणि शिवाजी पार्क येथील निवासस्थानावर ठेवल्याचे उपअधीक्षक चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही खासदारांना पोलिस महासंचालक कार्यालयाकडून वाय प्लस सुरक्षा दिल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78865 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top