कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

02156
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट
उपाध्यक्षपदी सोहन शिरगावकर
नागाव : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) अध्यक्षपदी एस. एस. इंजिनिअरिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर शहाजी भड आणि उपाध्यक्षपदी उगार शुगरचे संचालक आणि एस. बी. रिशेलर्सचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर सोहन शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली. गुजरात झोनच्या उपाध्यक्षपदी मानसिंगभाई पटेल यांची निवड झाली आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ही देशातील १९३६ पासूनची असोसिएशन आहे. साखर आणि साखरेशी निगडित उद्योगाच्या सर्व पैलूंचा समावेश असलेली कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी इतर राज्यामधील साखर आणि संबंधित उद्योगांचा विकास संपूर्ण भारतात करण्याचे ठरवले आहे.


११७७
दालमियाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन
पोर्ले तर्फे ठाणे ः येथील श्री दत्त दालमिया साखर कारखाना व दालमिया फौंडेशनच्या वतीने कोल्हापूर येथे सुरू केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ऊस विकास प्रमुख अलोक पांडे, युनिट हेड एस रंगाप्रसाद, सल्लागार एन. सी. पालिवाल, ऊस विकास अधिकार संग्राम पाटील, फौंडेशनचे अधिकारी, संजय बीडकुमार यांची भाषणे झाली. जनरल मॅनेजर केन श्रीधर गोसावी, जनरल मॅनेजर आनंद कामोजी. आनंद कदम, महावीर पाटील, मनिकंदन, ग्यानेंद्र मिश्रा, कनकसबाई, सुभाष डोरा आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नितीन कुळरूपे यांनी आभार मानले.

02716
कौलवमध्ये शंभूगिरी महाराजांची पुण्यतिथी
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील पुरातन गिरीमठामध्ये मठाधिपती परमपूज्य शंभूगिरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली. महाराजांच्या समाधीस चंदनगिरी महाराज, आनंदा बुवा व कृष्णात बुवा यांच्या हस्ते अभिषेक केला. नीलेश अस्वले, आयुष लोहार, सुकुमार लोहार, हनुमंत चौगले, तुषार सुतार, अजित पाटील, सौरभ पाटील, सचिन झांजे, सुरेश शिरसाठ, बंडोपंत सुतार यांचा गायन, तबलावादन व भजनाचा कार्यक्रम झाला.

वारणा दूध संघाचा आज वर्धापनदिन
वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध संघाचा ५४ वा वर्धापन दिन उद्या (ता. २०) होणार असून यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली. तात्यासाहेब कोरेनगर येथील संघाच्या मुख्य दुग्धालयात सकाळी महापूजा होणार असून प्रधान कार्यालयात प्रतिमा पूजन, संघाच्या अतिथीगृहात १० वाजता रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन होणार आहे. संघाचे सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचे वर्धापन दिनाचे कार्यक्रम होणार आहेत.

बाळासाहेब तोरस्कर यांची निवड
सोळांकूर : येथील सुप्रसिद्ध कवी व समाजसेवक बाळासाहेब तोरस्कर यांची प्रदेश काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षा विद्याताई कदम यांनी ही नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते व सांस्कृतिक विभाग कार्याध्यक्षा फरझाना इक्बाल डांगे, प्रज्ञा वाघमारे, नागेश निमकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान केले. तोरस्कर अनेक सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांचे संस्थापक व पदाधिकारी आहेत. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.

३७७४
मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा
म्हाकवे : मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने आणूर (ता. कागल) येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. व्ही. निरगुडे यांची भेट घेतली. मागासवर्गीय आयोग व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. सागर कोळी, मामा भोळे, सुनील गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78898 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top