
प्रांताधिकारी बारवे यांची हरपवडे धनगरवाड्यास भेट
37222
हरपवडे (ता. आजरा) : येथील धनगरवाड्यावरील ग्रामस्थांशी संवाद साधताना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे. या वेळी तहसीलदार विकास अहिर व अन्य.
प्रांताधिकारी बारवे यांची
हरपवडे धनगरवाड्यास भेट
आजरा, ता. १९ : आजरा-भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी हरपवडे धनगरवाड्याला भेट दिली. रस्त्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. पेरणोली (ता. आजरा) येथील नावलकरवाडी मार्गे रस्ता मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, वीज यासह मुलभूत सुविधांविषयी चर्चा झाली.
हरपवडे धनगरवाड्यावर आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची होणारी कसरत याबाबत सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्यावर जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी या वाड्याला भेट देत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी बारवे यांनी भेट दिली. रस्ता, वीज यासह मुलभूत सुविधांबाबत चर्चा झाली. पेरणोली पैकी नावलकरवाडी मार्गे रस्ता मिळाल्यास तो रहदारीच्या दृष्टीने सोयीचा होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हाच मार्ग व्हावा, अशी त्यांनी मागणी केली. त्याचबरोबर या वाडीवरील मुलभूत सुविधा याबाबत चर्चा झाली. या वसाहतीवरील प्रश्न टप्प्या टप्प्याने सोडवले जातील, असे प्रांताधिकारी बारवे यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार विकास अहिर, प्रभारी गटविकास अधिकारी सुधीर खोराटे, तालुका कृषी अधिकारी के. एन. मोमीन, ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे, तलाठी विनायक नाईक यासह महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--------------
चौकट
पेरणोली मार्गे रस्त्याची पाहणी
पेरणोली मार्गे नावलकर वसाहतीवरून धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी आज बांधकाम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे. ग्रामस्थांना सोयीस्कर असणाऱ्या रस्त्याची बांधणी केली जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78919 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..