पशुसंवर्धन योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुसंवर्धन योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा
पशुसंवर्धन योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा

पशुसंवर्धन योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्या
प्रशासक संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १९ : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळी गट वाटप, कडबाकुट्टी मशिन पुरवठा केला जाणार आहे. योजनाचा लाभ घेऊन पशुपालकांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी केले. योजनेसाठी १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तत्पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सेस फंडामधून ७५ टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये २ शेळींचे युनिट हे विधवा/परितक्त्या/ दारिद्र्यरेषेखालील महिला व निराधार महिलांना देण्यात येणार आहे. योजनेसाठी १२ हजार ४०० रुपये अनुदान, तसेच कडबाकुट्टी मशिनचाही पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थींनी विहित मर्यादेत कडबाकुट्टी मशिन खुल्या बाजारातून खरेदी केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने ५० टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. योजनांचे अर्ज पंचायत समिती स्तरावर असून लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव १९ जुलै ते १५ ऑगस्‍ट या कालावधीत पंचायत समिती स्तरावर स्वीकारण्यात येणार आहेत. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78938 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..