
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार
ich198.jpg
इचलकरंजी ः शिवसेना शहर कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सयाजी चव्हाण.
----
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार
इचलकरंजीतील शिवसेना पदाधिकारी बैठकीत निर्धार
इचलकरंजी, ता. १९ ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे राहण्याचा निर्धार आज शहर शिवसेना कार्यालयात झालेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शहरप्रमुख सयाजी चव्हाण होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यापुढेही शिवसेना अधिक भक्कमपणे कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मलकारी लवटे, महेश बोहरा, धनाजी मोरे, आप्पासाहेब पाटील, भरत शिवलिंगे, शिवाजी पाटील, भारत पोवार, मंगल मुसळे, मधुमती खराडे, शीतल मगदूम, मेहबूब मणेर, जावेद मोमीन, अस्लम खलिफा, सतीश लाटणे, उमेश पाटील, प्रताप घोरपडे आदी उपस्थीत होते. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात सहभागी झाल्याचे आजसमोर आले. त्यानंतर तातडीने ही बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78943 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..