घरफाळा सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा सवलत
घरफाळा सवलत

घरफाळा सवलत

sakal_logo
By

घरफाळ्यात चार टक्के
सवलत सप्टेंबरअखेर
कोल्हापूर, ता. १९ : महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून घरफाळा एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर चार टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. १ एप्रिल ते १८ जुलैअखेर ३० कोटी ७८ लाख ७९ हजार ८३६ इतका घरफाळा जमा केला आहे. १४,७९७ करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेचा लाभ घेतला. १ एप्रिल ते ३० जूनअखेर ६ टक्के सवलत योजना होती. त्यात ४६,०६० करदात्यांनी २६ कोटी ४२ लाख ३० हजार १२१ इतका कर भरणा केला. १ ते १८ जुलैअखेर ४ टक्के सवलत योजनेमध्ये १०,३८० करदात्यांनी ४ कोटी ३६ लाख ४९ हजार ७१५ रक्कम जमा केली आहे. मिळकतधारकांना पोस्ट ऑफिसमार्फत बिले लागू केली आहेत. ज्या मिळकतधारकांस बिल मिळाले नसेल तर शनिवार पेठ पोस्ट ऑफिस या ठिकाणी १५ दिवस बिले ठेवण्यात आली आहेत. तिथून बिले उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यानंतर सर्व वितरित न झालेली बिले ज्या त्या विभागीय कार्यालयामध्ये ठेवण्यात येणार आहेत. करदात्यांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78949 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..