सुब्रतो मुखर्जी फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल

sakal_logo
By

37247


सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा - लोगो


‘महाराष्ट्र’ - ‘शाहू’मध्ये आज अंतिम लढत
मुलीत उषाराजे हायस्कूल- विवेकानंद ज्युनिअरमध्ये सामना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : मनपास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध शाहू विद्यालय एसएससी यांच्यात अंतिम सामना होणार आहे,  १७ वर्षांखालील मुलीच्या जेतेपदासाठी उषाराजे गर्ल्स हायस्कूल, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज यांच्यात बुधवारी (ता. २०) लढत होणार आहे. येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महापालिका, प्राथमिक शिक्षण समिती आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत आज १७ वर्षांखालील मुले आणि मुलींचे सामने खेळवले गेले.
निकाल असा  ः
१७ वर्षांखालील मुले - विद्यापीठ हायस्कूल विरुद्ध भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल (१-०). विद्यापीठकडून स्वरूप घोरपडे १ गोल. 
* महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (४-०), महाराष्ट्रकडून आदित्य कल्लोळी २ गोल, देवराज जाधव, सर्वेश वाडकर प्रत्येकी १ गोल.
* सेंट झेवियर्स हायस्कूल विरुद्ध शिलादेवी डी. शिंदे हायस्कूल (१-०) सेंट झेवियर्सकडून ओम शिंदे १ गोल.
* शाहू विद्यालय एसएससी विरुद्ध स. म. लोहिया हायस्कूल (१-०) शाहूकडून तहा नदाफ १ गोल.
* विद्यापीठ हायस्कूल विरुद्ध वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल (२-०) विद्यापीठकडून प्रणव सासने २ गोल
* पहिला उपांत्य सामना महाराष्ट्र हायस्कूल वि वि सेंट झेवियर्स हायस्कूल ( ६-०) महाराष्ट्र हायस्कूलकडून आदित्य कल्लोळी ३ गोल, सर्वेश वाडकर २, देवराज जाधव १ गोल.
*दुसरा उपांत्य सामना शाहू विद्यालय एसएससी विरुद्ध विद्यापीठ हायस्कूल (२-१) शाहूकडून आरूष पाटील, अफान झारी प्रत्येकी १ गोल तर विद्यापीठकडून अर्शद डंगरे १ गोल.
--
१७ वर्षांखालील मुली-
* एस्तेर पॅटन हायस्कूल विरुद्ध न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, संभाजीनगर (२-०), एस्तर पॅटनकडून पूर्वा कुंभार व संजना पोवार प्रत्येकी १ गोल
* पहिला उपांत्य सामना उषाराजे गर्ल्स हायस्कूल विरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल (१-० ), उषाराजे हायस्कूलकडून सुमैया देसाई १ गोल
*दुसरा उपांत्य सामना विवेकानंद ज्युनिअर कॉलेज विरुद्ध एस्तेर पॅटन हायस्कूल (२-१), विवेकानंदकडून निदा सतारमेकर २, सानिका भोसले १ गोल

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78962 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..