
प्रशांत भाट यांची अनपेक्षित एक्झिट
37258
प्रशांत भाट यांची अनपेक्षित एक्झिट
छोटी जखमी, पण निष्काळजीपणा जीवावर बेतला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः यंदा पन्हाळा-पावनखिंड मोहिमा उत्साहात सुरू झाल्या असताना एका बातमीने साऱ्यांनाच धक्का दिला. शहरातील विविध उपक्रमांत सक्रिय असणारे प्रशांत भाट यांनी छोटी जखम असल्याने निष्काळजीपणा केला आणि त्यांच्या तो जीवावर बेतला. त्यांच्या या अनपेक्षित एक्झिटमुळे कोल्हापूरकर सोशल मीडियावरही भरभरून व्यक्त झाले.
प्रशांत भाट यांचे वय ५२.२६ जुलैला राजर्षी शाहू जयंतीदिनी झालेल्या शाहू प्रदक्षिणा उपक्रमात ते शाहूंच्या वेशभूषेत सहभागी होत साऱ्यांचे लक्ष वेधले होते. अंगात सदरा, धोतर, खांद्यावर घोंगडे, पायात अस्सल कोल्हापुरी चप्पला आणि हातात काठी असा त्यांचा सहभाग सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला. ते पेशाने करुळ घाटातील एका शाळेत शिक्षक. पदभ्रंमती, गड-किल्ल्यांच्या मोहिमात ते सहभागी असत. शाहू प्रदक्षिणेत कोल्हापुरी चपलाने त्यांच्या पायला जखम झाली आणि त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. किरकोळ उपचार करून त्यांनी तसा जखमी पाय घेऊन चाळीस किलोमीटरची पन्हाळा ते पावनखिंड पदयात्रा केली आणि पाठोपाठ करुळ घाटाची १२ किलोमीटरची पदयात्रा केली. पाऊस आणि खाली असलेला चिखल त्यांच्या जीवावर बेतला. गँगरीन झाले.. शुक्रवारी पाय अचानक फुगला. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78984 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..