परदेशी शिष्यवृत्तीसाठी आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आवाहन
परदेशी शिष्यवृत्तीसाठी आवाहन

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आवाहन

sakal_logo
By

परदेशात शिक्षणासाठी
शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ
कोल्हापूर : परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींची शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये निवड केली जाणार आहे. योजनेचे अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय (पुणे) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत असावी. अर्जाचा नमुना शासन निर्णय व सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंक ला भेट द्यावी, असेही श्री. लोंढे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78987 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top