खादी ग्रामोद्योग भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खादी ग्रामोद्योग भूमिका
खादी ग्रामोद्योग भूमिका

खादी ग्रामोद्योग भूमिका

sakal_logo
By

खादी ग्रामोद्योगाच्या
जागेवर महात्मा गांधीचे स्मारक
सुंदरराव देसाई ः महात्मा गांधी विचार मंचतर्फे दिशाभूल

कोल्हापूर, ता. २० ः गांधी विचारांवर चालणाऱ्या कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाचे काम खादी व ग्रामोद्योगाला उर्जितावस्था देण्याच्या उद्देशाने सुरू आहे, संघाने खरेदी केलेल्या पाटोळेवाडीजवळील जागेवर महात्मा गांधींचे स्मारक तसेच चरखा प्रशिक्षण केंद्र, ग्रामोद्योगी-कुटिरोद्योगांतील वस्तूंची विक्री व महिला सबलीकरणासाठी विशेष उपक्रम केंद्र केले जाणार असल्याचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी सांगितले.
संघाच्या वाटचालीबाबत महात्मा गांधी विचार मंचने ३१ मे २०२२ रोजी केलेल्या आंदोलनातून आक्षेप नोंदवून आरोप केले होते. तसेच काल ही भारती पोवार यांनी आरोप केले. यातून चुकीच्या पद्धतीने बदनामी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष देसाई यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘ संघाची स्थापना १९२७ मधील असून १९५६ मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत केली आहे. संघाने १९५६ मध्ये पाटोळेवाडीजवळील जमीन खरेदी केली. तिथे संघाच्या नियमावलीनुसार लघुउद्योग, कुटिरोद्योग, चरखा युनिट कार्यरत होते. संस्था तोट्यात असल्याने व आर्थिक नियोजन नसल्याने जागा खुली राहिली. तिथे अतिक्रमण तसेच कचऱ्याचा ढिग होऊ लागला. तसेच अवैध धंदेही सुरू झाले. स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या. त्यामुळे २०११ मध्ये संघाने कंपाऊंड मारले. २०१८ मध्ये पुन्हा तशीच तक्रार आल्याने सफाई करून घेतली. लॉकडाऊन काळात जागा बंदिस्त केली नसल्याने फेरीवाले येऊन बसले. त्यांना हाताशी धरून मंचने आंदोलन करून बदनामी केली.’’
ते म्हणाले, ‘‘ त्या जागेवर महात्मा गांधींचे स्मारक बनवण्याच्या योजना राबवण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. संस्थेकडे निधी नाही व सरकारकडून अपेक्षित मदत नाही, त्यामुळे विकसन करार केला आहे. त्यातून जागेचा विकास करून गांधी स्मारकाबरोबरच सुतकताई केंद्र, चरखा प्रशिक्षण केंद्र उभे करण्यात येणार आहे. ग्रामोद्योगी तसेच कुटिरोद्योग वस्तूंच्या विक्रीसाठी दुकानगाळे केले जाणार आहेत. तसेच महिला सबलीकरणासाठी विशेष उपक्रमाचे केंद्रही करण्यात येणार आहे. आम्ही केलेल्या करारानुसार विकास झाल्यानंतर गांधी विचाराला छेद देईल असे तिथे काही व्यवसाय नसतील.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79057 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top