विक्रमनगरातील चोरीचा १२ तासांत छडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikramnagar theft solved within 12 hours two arrested
घरफोडीचा छडा

विक्रमनगरातील चोरीचा १२ तासांत छडा

कोल्हापूर - विक्रमनगरातील ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरीचा अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आले. याप्रकरणी दोघांना अटक केली. सचिन शिवाजी आगलावे (वय २१) आणि साहिल चॉँदसाहेब गवंडी (वय २५, दोघे रा. विक्रमनगर) अशी त्या संशयितांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक इश्वर ओमासे यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले, विक्रमनगरातील खुशबू हे ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्याने चांदीचे दागिने आणि रोकड असा ३ लाख १८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक दीपिका जौंजाळ अमलदार देवानंद बल्लारी, अविनाश तारळेकर, सचिन पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती आधारे संशयित आगलावे आणि गवंडी या दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. दोघा संशयितांना न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या कारवाईत अमलदार समीर शेख, अरविंद पाटील, अमर आडुळकर, संजय जाधव, अमित सर्जे, प्रवीण पाटील, विशाल खराडे, विशाल शिरगावकर आदींचाही सहभाग होता असे निरीक्षक ओमासे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79088 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..