खड्डेच खड्चे चोहीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डेच खड्चे चोहीकडे
खड्डेच खड्चे चोहीकडे

खड्डेच खड्चे चोहीकडे

sakal_logo
By

37438
आजरा : येथील पेट्रोल पंपानजीक रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे. (छायाचित्र : श्रीकांत देसाई आजरा)

खड्डेच खड्डे
चोहीकडे..!
नागरिक, वाहनधारकांतून संताप, बांधकाम विभाग कुंभकर्णाच्या झोपेत
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २० : आजरा तालुक्यातील बहुतांशी रस्ते विशेष करून आजरा-गडहिंग्लज व आजरा आंबोली मार्ग खड्ड्यांनी भरून गेला आहे. अनेक ठिकाणी पडलेले खड्डे हे अत्यंत खोल असून वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरतच करावी लागत आहे. अपघाताच्या घटनाही घडत आहेत. खड्ड्याने भरलेल्या रस्त्यावरून रात्रीप्रवास करताना धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाल्याने खड्डेच खड्डे चोहीकडे..! म्हणण्याची वेळ आली आहे. नागरिक, प्रवासी व वाहनधारकातून संताप व्यक्त होत असून बांधकाम विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याची स्थिती आहे.
यंदाच्या पहिल्याच धुवॉंधार पावसाने आजरा तालुक्यातील बहुंताश रस्त्याची चाळणच केली आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून बाजूपट्ट्या निकामी झाल्या आहेत. आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते तर खड्ड्ये आहेतच. पण प्रमुख मार्ग म्हणून कोकणात उतरणारा आजरा-आंबोली मार्गाही खड्ड्यानीच भरला आहे. या खड्ड्यात गाडी उतरल्यास गाडीचे चाक निखळून पडते की काय अशी अवस्था होत आहे. गाडी खड्ड्यात उतरल्यावर बसणारा शरीराला हादरा अनेकांना गंभीर दुखापत करणारा ठरला आहे. दुचाकी घसरणे, चार चाकी अन्य वाहनांना धडकणे या प्रकारांसह अपघातामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे अशा रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. पर्यटक, नागरिक, वाहनधारकांतून याबाबत संताप व्यक्त होत आहे. याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क करता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. यातून ठेकेदारांना एक प्रकारे अभय मिळत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. यातून प्रवासी मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे.
-----------
चौकट
... साहेब महामार्ग नको; आधी खड्डे भरा
आजरा तालुक्यात संकेश्‍वर बांदा या रस्त्याचे नुकतचे सर्वेक्षण झाले आहे. या मार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हा महामार्ग कधीही होऊ देत पण आधी आजरा-गडहिंग्लज व आजरा-आंबोली रस्त्यावर पडलेले खड्डे तरी बुजवावेत, अशी आर्त हाक जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
--------------------
येथे काळजी घ्याच...
- संभाजी चौक, आजरा पेट्रोलपंप, महावितरणचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, महाराष्ट्र बॅंक एटीएम
- मडिलगे बस स्थानक परिसर, खेडे तिटा परिसर, वनविभागाची सुलगाव रोपवाटिका जवळ, व्हिक्टोरीया पूल, सोहाळे तिट्टा ते मसोबा परिसर देवर्डे तिटा, लक्ष्मी ओढा
- गवसे गावानजीक, धनगरमोळा परिसर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79198 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..