डेंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी
डेंगी

डेंगी

sakal_logo
By

शहरात ४४८ कंटेनरची तपासणी
ंमहापालिकेतर्फे डेंगी, चिकुनगुण्याचे सर्वेक्षण

कोल्हापूर, ता. २० : महापालिकेने शहरामध्ये १८७ घरांची तपासणी केली. ९ घरे दूषित आढळली, तर ४४८ कंटेनरपैकी २२ कंटेनर दूषित आढळले.
सर्वेक्षण साळोखेनगर, ओंकार पार्क, साने गुरुजी वसाहत, मोतीनगर, नेहरुनगर, राजेंद्रनगर, जरगनगर येथे किटकनाशक विभागाच्या पथकाने केले. शहरामध्ये डेंगी, चिकुनगुण्याची साथ येऊ नये यासाठी दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एकवेळा कोरडी करून घासून पुसून स्वच्छ ठेवावित. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, नारळाच्या करवंट्या, न वापरातील डबे, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी, झाडांच्या कुंड्या, फ्रीजच्या मागील ट्रे यात पाणी साचू देऊ नये, संशयित तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. रक्त नमुने घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79230 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..