
प्रिकॉशन डोस
शहरात प्रिकॉशन डोसचे
१२३८ जणांना लसीकरण
कोल्हापूर, ता. २० : आजादी का अमृत महोत्सव मोहिमेंतर्गत बुधवारी १८ वर्षांवरील पात्र १२३८ लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोसचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर २०, फ्रंटलाईन वर्कर १९, १८ ते ४४ वर्षांपर्यंत ५३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर ४५ ते ५९ वर्षांपर्यंत ४८८ नागरिकांचे व ६० वर्षांवरील १८१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी केले. १८ वर्षांवरील ज्या लाभार्थींनी दुसरा डोस घेऊन ६ महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत, त्यांना महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी प्रिकॉशन डोसचे लसीकरण देण्यात येत आहे. आजअखेर ४३,३२२ इतक्या हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना प्रिकॉशन डोसचे लसीकरण केले आहे. बुधवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ११०, राजारामपुरी येथे २३८, पंचगंगा येथे १०७, महाडिक माळ येथे ८८, सदरबाजार येथे ५७, फिरंगाई येथे १५१, सिद्धार्थनगर येथे ६४, आयसोलेशन येथे १३९, कसबा बावडा येथे ५७, फुलेवाडी येथे ९६, मोरे माने नगर येथे १०८ व सीपीआर हॉस्पिटल येथे २३ नागरिकांना प्रिकॉशन डोसचे लसीकरण केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79252 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..