आम्ही झालो कोल्हापुरी भाग एक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही झालो कोल्हापुरी भाग एक
आम्ही झालो कोल्हापुरी भाग एक

आम्ही झालो कोल्हापुरी भाग एक

sakal_logo
By

आम्ही झालो कोल्हापुरी! ः भाग - १
-
फोटो- 09874
-
लिड
कोण कन्नड बोलतो, कोण तमिळ, तर कोण थेट हिंदी भाषिक, तरीही त्यांची नाळ कोल्हापूरशी घट्ट झाली आहे. नोकरीनिमित्त त्यांचे वडील, आजोबा अथवा पणजोबा कोल्हापुरात आले आणि इथल्या मातीशी एकरूप झाले. लाल मातीचा रंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चढला. कोल्हापूरकर म्हणवून घेण्यात त्यांना विशेष अभिमानही वाटतो.

रिक्षाचालक वडिलांची मुले उच्च शिक्षित!
परशरराम नायडूंसह नातेवाईकही स्थिरावले ः भाषेपलीकडचे समृद्ध जग जपले

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : परशराम पेरुमल नायडू उचगावमधील रहिवासी. तिथल्या चपाळे चाळीत त्यांची भाड्याची खोली. ते तमिळ, तर त्यांची पत्नी तेलुगू भाषिक. आता दोघांसह मुलांच्या रोजच्या जगण्यातील भाषा मराठी झाली आहे. रिक्षाचालक म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुलांना उच्च शिक्षित केले आहे.
नायडू अंगाने सडपातळ. एका खोलीत ते पत्नी व मुलांसमवेत राहतात. त्यांचे वडील मुंबईला नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर ते कोल्हापूरला आले. खेळण्यांची विक्री करण्यास त्यांनी सुरुवात केली. नायडू वडिलांसमवेत या कामात गुंतले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. घरची जबाबदारी लहान वयातच अंगावर पडली. खेळण्यांची विक्री करून फारसे पैसे मिळत नसल्याने त्यांनी १९९१ ला रिक्षाचालक म्हणून नव्या कामाला सुरुवात केली. शिक्षण घेता आले नसल्याची सल त्यांना सतत बोचत राहिली. संसारात व्यस्त असताना मात्र त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.
मुलगी कृष्णावेलीने ताराराणी विद्यापीठातून बी. कॉम., तर कविताने कला शाखेतून पदवी घेतली आहे. किशोर बी. कॉम पदवीधर असून, त्याने गोखले महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सध्या तो एका खासगी संस्थेत काम करत आहे.
पत्नी घरकामात व्यस्त असते. नायडू कुटुंब दिवाळी, गणेशोत्सव, दसरा सण उत्साहाने साजरे करतात. नायडू यांचे वडील चेन्नई येथील असले तरी त्यांचे पै-पाहुणेही आता कोल्हापूरचे झाले आहेत.

कोट
रिक्षा व्यवसायातून रोजचा दिवस पुढे ढकलण्याइतपत कमाई होते. मुली व मुलगा यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. आमची मूळ भाषा आम्ही बोलायची विसरून मराठी हीच आमची मुख्य भाषा झाली आहे. आडनावामुळे आम्ही दक्षिण भारतीय आहोत, हे लोकांना कळते.
- परशराम नायडू

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79268 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..