महापूराचा पिकाना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापूराचा पिकाना फटका
महापूराचा पिकाना फटका

महापूराचा पिकाना फटका

sakal_logo
By

37455
कोवाड : नदीकाठच्या पिकांवर असा चिखल रापला आहे.

मातीच्या गाळाने पिके रापली
महापुराचा फटका; पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २० : ताम्रपर्णी नदीकाठावरील पिकांना महापुराचा फटका बसला आहे. मातीच्या गाळाने पिके रापली असून, ऊस व भात पिकांच्या सुऱ्यात मातीचा गाळ साचल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. कृषी विभागाने तत्काळ पूरग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.
गेल्या आठवड्यात चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ताम्रपर्णी नदीला महापूर आला. महापुराचे पाणी नदीकाठच्या शेतीत गेल्याने ऊस व भाताची पिके पाण्यात बुडाली. तब्बल दोन दिवस पाणी पिकांत राहिले. पावसाचे प्रमाण कमी झाले, पण धरणांच्या पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्याने नदीच्या पाण्याची पातळी स्थिर राहिली. पुराचे पाणी कमी होण्याला ५० तासांचा कालावधी लागला. यामुळे पाण्यातील गाळ उसाच्या व भाताच्या सुऱ्यातून गेला. महापूर उतरल्यानंतर नदीकाठची पिके रापट दिसू लागली आहेत. पाण्याच्या प्रवाहात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनीचेही नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे उसाचे पीक जमिनीवर पडले आहे. पाणी कमी झाले असले तरी पडलेला ऊस आता उभे राहू शकत नाही. त्यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. रोप लागण केलेले भाताचे पीक वाहून गेले आहे. काही ठिकाणी कुजले आहे. चार दिवस पाण्यात राहिलेल्या भाताचे नुकसान झाले असल्याने शेतकरी दुभार लागण करण्याचा विचार करत आहेत; पण पुन्हा पूर आला तर परत नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे. महापुरात बुडालेल्या उसाची वाढ खुंटणार असल्याचे शेती तज्ज्ञांचे मत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तत्काळ पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतीचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.
----------------
कोट
भात लावणीच्या हंगामात महापूर आल्याने नदीकाठच्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूर ओसरायला वेळ लागल्याने मातीचा गाळ ऊस व भात पिकाच्या सुऱ्यातून गेला आहे. त्यामुळे पुरात बुडालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी.
- सुनील पाटील, माणगाव

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79270 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..