सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पेद्रेवाडी ग्रामस्थांचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहाय्यक पोलिस निरीक्षकांना 
पेद्रेवाडी ग्रामस्थांचे निवेदन
सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पेद्रेवाडी ग्रामस्थांचे निवेदन

सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पेद्रेवाडी ग्रामस्थांचे निवेदन

sakal_logo
By

सहाय्यक पोलिस निरीक्षकांना
पेद्रेवाडी ग्रामस्थांचे निवेदन
आजरा, ता. २० ः ग्रामस्थांना मारहाण व दमदमदाटी करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पेद्रेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षकांना ग्रामस्थांनी दिले आहे. निवेदनात म्हंटले आहे, पेद्रेवाडी ग्रामपंचायतीच्या चौकशीचा विषय जिल्हा परिषेदत, तर निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात वाद सुरु आहे. याबाबत कामकाजासाठी गेलेल्या ग्रामस्थांना दमदाटी व मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हल्ले देखील झाले आहेत. गेल्या काही दिवसात असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याचे पुरावे व मारेकऱ्यांची छायाचित्र संबंधीत पोलिस ठाण्याकडे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाजासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर यापुर्वी ३० मे तसेच ११ जुलै असे प्रकार घडले आहेत. प्रत्येक वेळी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र संबंधीतावर कोणतीही कारवाई झालेली नाही. ग्रामस्थांना धमकी देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाची प्रत दिली आहे. निवेदनावर विकास चव्हाण, लहू लोहार, अशोक लोहार, निरंजन चव्हाण, बबन कातकर, प्रभाकर चव्हाण, शिवाजी डोंगरे, सुरेश कबीर, पांडूरंग ढवळे, साधना डोंगरे, लता डोंगरे, मंगल चव्हाण, सागर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79290 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..