शिस्त पाळा, कारवाई टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिस्त पाळा, कारवाई टाळा
शिस्त पाळा, कारवाई टाळा

शिस्त पाळा, कारवाई टाळा

sakal_logo
By

महापालिकेतून...

शिस्त पाळा, कारवाई टाळा
भरारी पथकाची नियुक्ती; प्रशासकीय कामकाजास लागणार शिस्त; दंडात्मक कारवाईही

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २० ः महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात आता अधिक शिस्त येणार आहे. कामचुकार अथवा बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता तपासणी व भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी प्रशासक सुधाकर देशमुख यांनी तिघांचे तपासणी व भरारी पथक नियुक्त केले आहे. शिस्त पालन न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर यापुढे या पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पालिका असताना प्रशासकीय कामकाजात बेशिस्तपणा जाणवत होता. महापालिका झाल्यानंतर हळूहळू प्रशासकीय शिस्त वाढत आहे. त्यामध्ये आणखीन सुधारणा अपेक्षित आहेत. प्रशासक देशमुख यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत. आपल्याकडे दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी दक्षता घेताना दिसत आहेत.
आता यापुढे कार्यालयीन शिस्त अधिक प्रभावीपणे राहण्यासाठी आयुक्त देशमुख यांनी तपासणी व भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाकडून कशाप्रकारे कारवाई अपेक्षित आहे, याची संहिताही श्री. देशमुख यांनी ठरवून दिलेली आहे. त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. या पथकामध्ये सुनील बेलेकर, रामचंद्र कांबळे व प्रदीप चौगुले या तीन लिपिकांचा समावेश केला आहे. या प्रक्रियेतून महापालिकेची चांगली प्रतिमा जनमानसांत निर्माण करण्याचे प्रयत्न श्री. देशमुख यांचे आहेत. उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्या नियंत्रणाखाली हे पथक कार्यरत राहणार आहे.
---------
पथकाचे कामकाज असे असेल...
तपासणी व भरारी पथकास तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी पथक प्रमुखाच्या स्वाक्षरीने संबंधित खातेप्रमुख व विभाग प्रमुखांना कळवण्यात येणार आहेत. यासाठी वरिष्ठांच्या मान्यतेची गरज असणार नाही. संबंधित विभागप्रमुखांनी यासंदर्भातील बाबींची तीन दिवसांच्या आत पुढील कार्यवाही करणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये कार्यालयीन शिस्तीसाठी काय उपाययोजना केल्या अथवा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली, हे पथकास कळवणे विभागप्रमुख व नियंत्रण अधिकारी यांची जबाबदारी असणार आहे. याबाबतचा आढावा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.
-----------
प्रशासकीय शिस्तीसाठी अशी होईल कार्यवाही...
* पथकाने कोणत्याही विभागाची अचानक तपासणी करणे
* अन्यत्र फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांना जागेवर जाण्यास भाग पाडणे
* कामकाजावेळी एकत्र गप्पा मारणाऱ्यांवर कारवाई करणे
* कामाशिवाय येऊन बसणाऱ्या नागरिकास मज्जाव करणे
* हजेरी, हालचाल, फिरती रजिस्टर यांची अचानक तपासणी करणे
* ओळखपत्र न वापरल्यास दंडात्मक कारवाई करणे
* गणवेश न वापरल्यास दंडात्मक कारवाई करणे
* केवळ रजेचा अर्ज टाकून जाणाऱ्यांवर कारवाई करणे
* वरिष्ठ स्तरावरून आलेल्या निर्देशांनुसार कामकाज करणे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79330 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..