मोबाईल फायनान्सवर देण्याचे अमिष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल फायनान्सवर देण्याचे अमिष
मोबाईल फायनान्सवर देण्याचे अमिष

मोबाईल फायनान्सवर देण्याचे अमिष

sakal_logo
By

फायनान्सवर मोबाइल
देण्याच्या आमिषाने फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः फायनान्सवर मोबाइल देतो, असे सांगून १ लाख २० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला. योगेश मधुकर बामणीकर (क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की अमोल पोवार हे क्रांतिसिंह नाना पाटीलनगरात राहतात. त्यांना संशयित योगेशने नवीन मोबाइल संच फायनान्सवर घेऊन देतो, असे सांगितले. त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना शहरातील तीन वेगवेगळ्या मोबाइल शॉपीमध्ये बोलून घेतले. त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. त्याचा गैरवापर करून दोन फायनान्स कंपनीतून कर्ज प्रकरणे मंजूर करून पोवार आणि नातेवाईकांचा पाच मोबाइल संच खरेदी करून त्याची परस्पर विल्हेवाट लावली. हा प्रकार २५ एप्रिल ते आजअखेर घडला, अशी फिर्याद पोवार यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79353 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top