
आयएमए-पालिकेतर्फे डेंगी तपासणी शिबीरांना प्रारंभ
डेंगी तपासणी शिबीरांना
आयएमए-पालिकेतर्फे प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : शहरातील वाढत्या डेंगी व चिकनगुनिया साथीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि आय.एम.ए.च्यावतीने आजपासून (ता. २१) डेंगी-चिकनगुनिया तपासणी शिबीरांना प्रांरभ झाला. आज भीमनगर, शाहू सभागृह आणि सावित्रीबाई फुले विद्यालयात पहिले शिबीर झाले. आढावा बैठकीत ठरवण्यात आलेल्या उपाययोजनेपैकी एक शिबीरांची कार्यवाही पालिकेकडून सुरु केल्याचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी सांगितले.
उद्या (ता. २२) सायंकाळी चार वाजता क्रिएटिव्ह हायस्कूल, काळभैरी रोडवरील गडहिंग्लज हायस्कूल, साधना हायस्कूलमध्ये शिबीर होणार आहे. २३ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयाजवळ विरंगुळा केंद्र, बॅ नाथ पै विद्यालय, वडरगे रोडवरील केडीसीसी कॉलनीतील अंगणवाडीत, तर २५ जुलै रोजी वि. दि. शिंदे हायस्कूल, जागृती हायस्कूलमध्ये अशी शिबीरे होतील. सर्व शिबीरांच्या वेळा सायंकाळी चार ते सहापर्यंत राहणार आहेत. गरजूंनी या शिबीरांचा लाभ घेवून आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन खारगे यांनी केले आहे.
दोन दिवसापूर्वी शहरातील या साथीच्या आजाराबाबत आढावा बैठक घेतली होती. त्यात आयएमएच्या सहकार्याने आरोग्य शिबीरे घेण्याचे ठरविले होते. त्याची कार्यवाही आजपासूनच केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. डेंगी व चिकनगुनिया साथ अटोक्यात आणण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. नागरिकांनीही आपल्या स्तरावर परिसर स्वच्छता आणि घरातील पाणीसाठ्याच्या साहित्याची स्वच्छता करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79472 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..