सात वर्ग, शंभर विद्यार्थी, शिक्षक फक्त दोन; मराठी शाळेतील चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
सात वर्ग, शंभर विद्यार्थी शिक्षक मात्र केवळ दोन

सात वर्ग, शंभर विद्यार्थी, शिक्षक फक्त दोन; मराठी शाळेतील चित्र

चंदगड : उमगाव (ता. चंदगड) येथील मराठी शाळेत सातवीपर्यंतचे वर्ग असून, शंभराहून अधिक विद्यार्थी आहेत. मात्र, केवळ दोन शिक्षकांना ही शाळा सांभाळताना कसरत करावी लागते. प्रशासनाने पुरेसे शिक्षक नियुक्त करावे, अशी येथील ग्रामस्थ व पालकांची मागणी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरील हे गाव दुर्गम आहे. परिसरातील न्हावेली, पेडणेकरवाडी, माळी, सावतवाडी येथील विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येतात. जिल्हा परिषदेच्या शाळांत विद्यार्थी नाहीत, अशी सार्वत्रिक तक्रार केली जात असताना इथल्या शाळेत मात्र शंभराहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यांचा बौद्धिक गुणांकही चांगला आहे. परंतु, दोन शिक्षकांना सात वर्ग सांभाळताना आणि अभ्यासक्रम घेताना खूपच अडचणी येत आहेत. प्रशासनाच्या धोरणानुसार आणखी तीन शिक्षकांची इथे गरज आहे. चौथीपर्यंत ६० हून अधिक विद्यार्थी असतील तर तीन शिक्षक दिले जातात. त्या नियमालाही ही शाळा पात्र आहे. परंतु, सर्वच नियम धाब्यावर बसवून केवळ दोन शिक्षकांवर या शाळेची जबाबदारी सोपवली आहे.

काही कारणास्तव एखाद्या शिक्षकाने सुटी घेतल्यास केवळ एकाच शिक्षकाला जबाबदारी पार पाडावी लागते. एकतर हे गाव दुर्गम असून, तालुक्याच्या गावापासूनही दूर अंतरावर आहे. विद्यार्थ्यांची संख्या चांगली असल्याने प्रशासनाने प्राधान्याने इथे पुरेसे शिक्षक नियुक्त करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात वारंवार मागणी केली. परंतु, दुर्लक्ष होत आहे. इथली गरज विचारात घेऊन हा प्रश्‍न सोडवावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79490 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..