
कार्यकर्त्यांना येणार भाव
धनुष्यबाण व वाघ फोटो
‘कट्टर’ कोण,‘बंडखोर’ कोण?
शिवसेनेत संभ्रमावस्था वाढली; कार्यकर्त्यांना आली मागणी
लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक आणि बंडखोरांच्या हाती लागलेले नेते यांच्यातील कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे. स्थानिक नेत्यांना मानणारा एक गट आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे म्हणून शिवसेनेला मानणारा एक गट आहे. आता नेत्याकडे असलेले कार्यकर्ते बंडखोरांकडे तर बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कार्यकर्ते शिवसेनेत असल्याचे दिसून येते. मात्र विरोधी गटातील कार्यकर्ते आपल्याकडे कसे येतील? यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. गुप्त बैठकांसह कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे काम सुरू झाले आहे. यातूनच हिंदुत्वाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना मागणी वाढली आहे.
शिवसेना नेमकी कोणाची? हे ठरण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. जोपर्यंत यावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत बंडखोर गट आणि मूळ शिवसेना अशा दोन प्रवाहात शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. शहरात दोन शहरप्रमुख स्वतःलाच शिवसेनेचे असल्याचे सांगतात. ते पत्रकार परिषदही शिवसेनेचे आहेत म्हणून घेतात. आंदोलन करतानाही शिवसेनेचे म्हणून करतात. यामुळे कट्टर शिवसैनिक आणि नेत्यांच्या मागे आलेले बंडखोर शिवसैनिक असे दोन गट दिसून येत आहेत. ‘आम्ही कोणा नेत्यांमुळे नाही तर बाळासाहेबांची शिवसेना मानतो’ असेही काही कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे ज्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच ठिकाणी आम्ही असेही काही कार्यकर्ते सांगतात.
आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानतो. पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आमचे दैवत आहे. पण आम्ही शिंदे गटात आहोत. असेही म्हणणारे नेते आता बंडखोरांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते हे बंडखोर गटाचे की बाळासाहेब ठाकरे गटाचे हे त्यांनाच कळत नाही. नुकतीच बंडखोर गटातील काहींनी मूळच्या शिवसेनेच्या एका बैठकीला हजेरी लावली. येथे त्यांचे मन परिवर्तनाची चर्चा झाली. खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे हे कार्यर्त्यांपर्यंत पोचविण्याचे काम आता कट्टर शिवसैनिकांकडून होत आहे.
-------------------
आम्ही शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आहोत. आजपर्यंत शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे एवढंच मानले आहे. नेता कोण आहे? हे आजपर्यंत पाहिले नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे सर्व पक्षसोडून गेले तरीही आम्ही ३८ वर्षे शिवसेनेत आहोत. येथून पुढे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे.
- रवी चौगले, माजी जिल्हाप्रमुख
-----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79498 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..