पाचगावला दिवसाआड पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचगावला दिवसाआड पाणी
पाचगावला दिवसाआड पाणी

पाचगावला दिवसाआड पाणी

sakal_logo
By

37633

पाचगाव परिसरात दिवसाआड पाणी
डॉ. बलकवडे; परिसरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांची चर्चा

कोल्हापूर, ता. २१ ः पाचगावकरांना भेडसावत असलेल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पाचगाव ग्रामस्थांसह महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार सोमवारपासून पाचगाव परिसरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची ग्वाही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिली.
महापालिकेकडून पाचगावसह आसपासच्या भागात करण्यात येणाऱ्या पुरवठाबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. आर. के. नगर, दिंडेनगर, अष्टविनायकनगर, गुलमोहर कॉलनी, भारत माता कॉलनी, प्रथमेश कॉलनी, तारा कॉलनी, सहजीवन सोसायटी, द्वारकानगर, शांतादुर्गा नगर, केएमटी कॉलनी, निगडे मळा, गणेशनगर, रेणुकानगर, हरी पार्क, चित्रनगरी आणि मोरेवाडी या भागांतील नागरिकांची गैरसोय होत होती. त्यानुसार आमदार पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी महापालिका निवडणूक कार्यालयात बैठक झाली. भाग मोठा असल्याने प्रश्न निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाचगावसह आसपाच्या भागाला पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतो. तो दिवसाआड करण्याची सूचना आमदार पाटील यांनी केली. प्रशासक बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले.
पाचगावच्या उपसरपंच डॉ. स्नेहल शिंदे, सदस्य प्रवीण कुंभार, संग्राम पोवाळकर, संदीप गाडगीळ, शिवाजी दळवी यांनी प्रश्न मांडले. पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी बदलाव्यात, सुभाषनगरमधील पंपिंग सुरळीत करावे, अशा मागण्या केल्या. पाचगावमध्ये गळती उद्भवल्यास ग्रामपंचायतीला दुरुस्त करावी लागते. डिपॉझिट आणि बिल महापालिका घेत असेल, तर देखभालीचा भुर्दंड ग्रामपंचायतीला का, असा सवाल उपस्थित केला. जुन्या मोटारी बदलण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन बलकवडे यांनी दिले. जल अभियंता हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, प्रिया पाटील, चेतन आरमार, दत्ता तिवले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79507 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top