महापालिकेला आता सुरक्षा गार्डचे कवच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेला आता सुरक्षा गार्डचे कवच
महापालिकेला आता सुरक्षा गार्डचे कवच

महापालिकेला आता सुरक्षा गार्डचे कवच

sakal_logo
By

महापालिकेला आता सुरक्षा गार्डचे कवच
२४ तास असणार बंदोबस्त तैनात : अनुचित प्रकार टाळण्यासाठी होणार मदत

पंडित कोंडेकर : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ : इचलकरंजी महापालिकेच्या सुरक्षेसाठी आता १२ सुरक्षा गार्ड तैनात असणार आहेत. मुंबईतील एका शासन अंगीकृत संस्थेतर्फे ही सशुल्क सेवा पुरवण्यात येणार आहे. हे सुरक्षा गार्ड शस्त्रधारी असणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना पोलिसांप्रमाणे विशेष अधिकार असणार आहेत. यामुळे महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये आंदोलनासह अन्य काही कारणास्तव होणारे गोंधळाचे प्रकार सहजपणे टाळता येणार आहेत.
इचलकरंजी पालिका अस्तित्वात असताना अनेक नागरी प्रश्नांवर उग्र आंदोलने झाली आहेत. यामुळे काही अनुचित प्रकारही घडले आहेत. आक्रमक आंदोलनामुळे आंदोलक व अधिकारी यांच्यात वादावादी झाल्यामुळे अनेकवेळा तणावपूर्ण परिस्‍थिती निर्माण झाली होती. तर काही प्रसंगात वाद पोलिस ठाण्यांपर्यंतही पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका अस्‍तित्वात असताना कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबत ठरावही केला होता. मात्र ही बाब अव्यवहार्य आहे. पण आता महापालिका झाल्यामुळे त्याला पर्याय म्हणून कायमस्वरुपी शस्त्रधारी सुरक्षा गार्ड तैनात करणे शक्य आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक महापालिकेत अशा प्रकारे सुरक्षा गार्ड नियुक्त केले आहेत. त्याच धर्तीवर इचलकरंजी महापालिकेत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
--------
अतिक्रमण काढताना होणार वापर
शासन अंगीकृत असलेल्या मुंबईतील एका संस्थेकडून १२ सुरक्षा गार्ड इचलकरंजी महापालिकेला पुरविण्यात येणार आहेत. पोलिसांप्रमाणेच यांना विशेष अधिकार असणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण काढताना त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. आंदोलनावेळी होणाऱ्या गोंधळालाही ब्रेक लावता येणार आहे. मुळात पोलिस बंदोबस्त अनेकवेळा मिळत नाही. त्यामुळे काही वादग्रस्त अतिक्रमण काढण्याची मोहीम पुढे ढकलावी लागते. तर आंदोलनावेळी पोलिस उपस्‍थित असतातच असे नाही. अशावेळी हे सुरक्षा गार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
----
महापालिका आयुक्तांनाही सुरक्षा
महापालिका प्रशासकीय इमारतीला सुरक्षा गार्ड २४ तास सुरक्षा देणार आहेत. यामध्ये आठ तासांप्रमाणे तीन शिफ्टमध्ये किमान दोन अथवा तीन सुरक्षा गार्ड आपले कर्तव्य बजावणार आहेत. तर महापालिका आयुक्तांनाही या माध्यमातून कायमस्वरूपी सुरक्षा असणार आहे. सुरक्षा गार्ड यांच्या ड्यूटीचे नियोजन करण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित संस्थेचा एक पर्यवेक्षकही असणार आहे. या संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्याने नुकतीच महापालिकेला भेट देऊन सर्व माहिती घेतली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79534 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top