खराब रस्ते महिन्यात दुरूस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खराब रस्ते महिन्यात दुरूस्त
खराब रस्ते महिन्यात दुरूस्त

खराब रस्ते महिन्यात दुरूस्त

sakal_logo
By

पावसाने खराब झालेल्या रस्त्यांची
दुरुस्ती महिन्याभरात पूर्ण करावी

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेतला आढावा

कोल्हापूर, ता. २१ : महापालिकेने केलेले रस्ते खराब का झाल्याची विचारणा करत पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम १५ दिवसांत सुरू करून महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व उपशहर अभियंत्यांना दिल्या. यावेळी आयआरबीने केलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी ६० कोटींची आवश्‍यकता असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
खराब रस्त्यांबाबत डॉ. बलकवडे यांनी निवडणूक कार्यालयात आढावा घेतला. गणेश उत्सवासाठी मिरवणुकीचा मार्ग व मुख्य रस्ते तातडीने दुरुस्त करण्याच्याही सूचना शहर अभियंत्यांना दिल्या.
ज्या ठेकेदारांचे रस्ते खराब झाले आहेत, ते दोषदायीत्व कालावधीत दुरुस्त करून घ्यावेत. या रस्त्यांची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन वर्षांत रस्ते केले आहेत, त्यांची यादी मागवण्याचीही सूचना शहर अभियंत्यांना दिली.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आयआरबीने केलेल्या रस्त्यांची १० वर्षे डागडुजी झाली नाही, त्यांची डागडुजी आवश्यक असून, यासाठी ६० कोटींची आवश्यकता असल्याचे सांगितले. ४ ते ५ वर्षे रस्ते केलेले नाहीत, त्यावर जास्त खड्डे आहेत. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्कचे काम गणेशोत्सवापूर्वी प्राधान्याने करण्यात येणार आहे. नगरोत्थान पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मुख्‍य रस्ते करण्याचा शासनास प्रस्ताव सादर केला आहे. अंतिम मंजुरी यायची आहे. त्यामुळे या प्रस्तावातील मुख्य रस्त्यांची डागडुजी अथवा ते नवीन केले नसल्याचे सरनोबत यांनी सांगितले.


चौकट
वॉर रुमला नोंदवा तक्रारी
महापालिकेने केलेल्या रस्त्यांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. या रस्त्यांची यादी नागरिकांनी पाहून त्यावर खड्डे अथवा खराब झाले असल्यास त्वरित महापालिकेच्या वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. रस्त्यांबाबतच्या तक्रारी वॉर रुममधील ०२३१-२५४२६०१, २५४५४७३ या फोन नंबर्सवर नोंदवाव्यात. सकाळी १० ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79611 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..