फेरीवाल्यांच्या विरोधामुळे तणाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाल्यांच्या विरोधामुळे तणाव
फेरीवाल्यांच्या विरोधामुळे तणाव

फेरीवाल्यांच्या विरोधामुळे तणाव

sakal_logo
By

37693
37731

------------
फेरीवाल्यांच्या विरोधामुळे तणाव
डेक्कन चौकात कारवाईला ‘ब्रेक’ ः अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच

इचलकरंजी, ता. २१ ः तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधातील मोहिमेला आज डेक्कन चौक परिसरात ‘ब्रेक’ लागला. येथे असलेल्या फेरीवाल्यांनी विरोध दर्शवला. यावेळी वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
याबाबत आता उद्या (ता. २२) पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. दरम्यान, आज तीनबत्ती चौकातील चार, तर नारायण चित्रमंदीर परिसरातील टपरीसह हातगाडा जप्त केला.
डेक्कन चौक परिसरात फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. आज सकाळी येथे अतिक्रमण निर्मूलन पथक गेले. त्यावेळी खाद्य पदार्थाचा एक हातगाडा उचलताना वादावादी झाली. येथे कारवाई करण्यास फेरीवाल्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे पथकाला तेथून माघारी फिरावे लागले.
फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने महापालिकेत येऊन सहायक अतिरिक्त आयुक्त केतन गुजर यांना निवेदन सादर केले. नियम व अटी घालून व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. पण कोणत्याही परिस्थितीत ही मोहीम थांबवली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासक सुधाकर देशमुख यांनी पोलिस बंदोबस्त घेऊन संबंधित अतिक्रमण दूर करण्याच्या सूचना पथकाला दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांना बंदोबस्ताबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार उद्या (ता. २२) सकाळी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे नियोजन सुरू होते.
दरम्यान, तीनबत्ती चौकात बंद असलेले ‘चिकन ६५’ खाद्य पदार्थाचे चार हातगाडे जप्त केले. नारायण चित्रमंदिराजवळ पानपट्टीची बंद टपरी व एक हातगाडा जप्त केला. याशिवाय सहा दुकानांचे स्टॅन्ड बोर्ड जप्त केले.
----
व्यावसायिकांचे अतिक्रमण दूर
महात्मा गांधी पुतळा परिसरातील छाबडा इमारतीशेजारी कुंकूसह इतर साहित्य विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यांनी दुकानसमोर अतिक्रमण केले होते. आज सकाळी पथकाने त्यांचे अतिक्रमण हटवण्यास भाग पाडले. त्यामुळे या दुकानांसमोरील मार्ग मोकळा झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79615 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..