जामसंडेत बिबट्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जामसंडेत बिबट्याची दहशत
जामसंडेत बिबट्याची दहशत

जामसंडेत बिबट्याची दहशत

sakal_logo
By

37707 व 37708
जामसंडे : मळई भागात आढळलेले बिबट्याच्या पावलांचे ठसे.

जामसंडेत बिबट्याची दहशत
बछड्यांसह संचार; सलग दुसऱ्या दिवशी वासरांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ : बिबट्याने सलग दुसऱ्‍या दिवशी जामसंडे मळई भागातील एकाच शेतकऱ्‍याच्या एकूण तीन वासरांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन जनावरे मृत्युमुखी पडली असून, एक गंभीर जखमी आहे. हल्ला करणारी बिबट्या मादी व तिचा लहान बछडा असल्याचे निरीक्षण वनविभागाने नोंदवले. परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. वासरावरील हल्ल्याच्या घटनेवरून मादी बछड्याला शिकारीचे प्रशिक्षण देत असावी, असा अंदाज वज्यजीव अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार यांनी वर्तवला.

जामसंडे मळई परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे स्थानिकांना जाणवत होते. जामसंडे मळई भागात मंगळवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्‍याच्या गोठ्यातील गुरांपैकी एका वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याला ठार केले होते. ही घटना बुधवारी (ता. २०) निदर्शनास आली. त्यातच पुन्हा बुधवारी रात्रीच्या सुमारास आणखी दोन वासरांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एका वासराचा मृत्यू झाला, तर दुसरे गंभीर जखमी झाले. एकाच शेतकऱ्‍याची दोन वासरे मृत्युमुखी पडल्याने तसेच आणखी एक जखमी झाल्याने मोठे नुकसान झाले. वनपाल सादिक फकीर, वज्यजीव अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले. त्यावरून हल्ला करणारी बिबट्याची मादी असून तिच्यासोबत बछडा असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. यावेळी संबधित शेतकऱ्‍याला वनविभागाने मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.
जखमी वासरावर पशुधन विकास अधिकारी डॉ. माधव घोगरे यांनी उपचार केले. त्यांच्या माहितीनुसार जखमी वासराच्या गळ्याचा चावा घेण्यात आल्याने दुखापत मोठी आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून जखम खोलवर आहे. घटनास्थळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, स्थानिक नगरसेवक रोहन खेडेकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी भेट दिली. दरम्यान, वस्तीपर्यंत बिबट्याचा संचार होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मळई भागात वासरावर हल्ला करणारी लहान बछड्यासह बिबट्याची मादी आहे. परिसरात आढळलेल्या ठशावरून तसे निदर्शनास येत आहे. बछडा लहान असल्याने सुरुवातीच्या काळात शिकार कशी करावी, याचे मादीकडून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे वासरांवर त्यांनी हल्ला चढवल्याचे दिसत आहे. आतापर्यंत दोन वासरांचा मृत्यू झाला असून एकाची स्थिती गंभीर आहे.
- प्रा. नागेश दप्तरदार, मानद वन्यजीव रक्षक, सिंधुदुर्ग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79646 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top