१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

पर्यटकांनी मुलांची काळजी घ्यावी
सध्या महाराष्ट्रात पर्यटनाला चांगले दिवस आले असून, राज्यातील सर्व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी दिसून येते. पर्यटनामुळे रोजगार निर्मिती होते. जनतेच्या खिशात चार पैसे येऊन त्यांचे जीवन आनंदी होण्यास मदत होते. नुकतीच एक बातमी दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहण्यात आली. त्यात लोणावळा येथे पर्यटकाचा मुलगा फार्म हाउसच्या स्वीमिंग टँकमध्ये पडून मृत्युमुखी पडला. अशा तऱ्हेच्या दुर्दैवी घटना घडत असतात. बरेच पर्यटक फार्म हाउस, हॉटेल किंवा प्रार्थनास्थळात गेल्यावर लहान मुलांना एका ठिकाणी ठेवून स्वतः इतर कामात व्यस्त असतात. अशा वेळी लहान मुले जवळच असणाऱ्या स्वीमिंग टँक, रस्ता, गच्ची अशा ठिकाणी जातात. त्या वेळी त्यांचा अपघात होण्याची भीती असते. गर्दीच्या ठिकाणी मुले चुकल्याची बरीच उदाहरणे आहेत. त्यानंतर पालकांची होणारी धावपळ, मनःस्ताप विचार करण्यासारखा असतो. म्हणून पर्यटकांनी आपल्या सोबत आलेल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांच्या गळ्यात नाव, गाव, पत्ता, दूरध्वनी वा भ्रमणध्वनी क्रमांक असलेले ओळखपत्र घालून ठेवावे. मुलांची काळजी घेणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.
पी. एस. कुलकर्णी, कोल्हापूर

कठोर कायद्यांपेक्षा मानसिक बदल आवश्‍यक
हल्ली रोज सकाळी वृत्तपत्र उघडले की त्यात महिला, युवती वा अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची निदान एक तरी बातमी असते. शिवाय, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही अशा बातम्या दिसून येतात. अत्याचाराच्या विकृतीला प्रतिबंधासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी वाढत आहे. मात्र, पूर्वीच्या कठोर असलेल्या कायद्यांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी होते का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. कठोर कायदे केले तरी मानसिकतेचे काय, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. केवळ कायदे कठोर करून स्त्रियांवरील अत्याचार थांबविता येतील का? समाजातील दुष्प्रवृत्तींना उखडून टाकण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्याची तेवढीच आवश्‍यकता आहे. मुळात मानसिकतेत बदल झाला तर कायद्याचीही गरज उरणार नाही. रस्त्यात असे काही घडते, तेव्हा अनेक जण बघ्याची भूमिका घेत असतात. त्यांना चौकशीची कटकट नको असते. कठोर कायदे, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आदी झाले तरी मुळातच पुरुषांच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे.
अरुण कोटगी-बेनाडीकर, कोल्हापूर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79652 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top