आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

37724

राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग प्रशिक्षण
शिबिरात कोल्हापूरकरांचा विक्रम

कोल्हापूर ः सुरक्षित जीवन ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून प्राथमिक उपचार शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण संपूर्ण भारतात राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग या संघटनेतर्फे देण्यात येते. या अंतर्गत झालेल्या प्रशिक्षण शिबिरात सर्वाधिक कोल्हापूरकरांनी सहभाग घेत विक्रम नोंदवला.
जिल्हाप्रमुख कृणाल जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी जलतरण तलाव, शिवाजी जलतरण तलाव, सागर पाटील जलतरण तलाव, रमणमळा, शांतिनिकेतन स्विमिंग पूल, इचलकरंजी, भोगावती जलतरण तलाव, रंकाळा तलाव आणि भिमाशंकर तलाव येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात चार ते सत्तर वर्षांपर्यंतच्या ७९५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. शिबिरात सुरक्षित पोहणे, अचानक गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर कशाप्रकारे बचाव कार्य करावे, याच्या प्रात्यक्षिकांबरोबरच विविध बचावात्मक साहित्य कसे हाताळावे, ऑक्सिजन कशा पद्धतीने घ्यावे, याबाबतची माहिती शिबिरात दिली. श्रीकांत जांभळे, प्रभाकर डांगे, मानसिंग पाटील, नीळकंठ आखाडे, अजय पाठक, महेश पाटील, सदाशिव साळवी, तेजस नायर, अर्जुन मगदूम, उत्तम बरगे, उमेश कोडोलीकर, अजित पाटील आदींनी सहकार्य केले.
.......
37723

‘पंजे विसर्जनावेळी
वाहतूक मार्गात बदल करा’
कोल्हापूर ः हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरमचा सण आता काही दिवसांवर आला आहे. तीस जुलै ते नऊ ऑगस्ट या काळात हा सण साजरा होणार आहे. नऊ ऑगस्टला पंजे विसर्जन होणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करावा, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर मोहरम उत्सव समितीतर्फे पोलिस प्रशासनाला देण्यात आले. सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत छत्रपती शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश ते पंचगंगा घाट हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवावा, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात ओंकार शिंदे, महेश कदम, मासूम मकानदार, प्रदीप सुतार, आशिष पडवळ, इम्रान बागवान, सुशांत निकम, सौरभ पोवार आदींचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79660 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..