
भाजपचा बावड्यात आनंदोत्सव
37743
04177
राष्ट्रपती मुर्मू यांच्या निवडीचा आनंदोत्सव
भाजपतर्फे कसबा बावडा येथे साखर-पेढे वाटप
कोल्हापूर, ता. २१ ः राष्ट्रपतीपदी भारतीय जनता पक्षाच्या द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी भगवा चौक येथे नागरिकांना साखर-पेढे वाटले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंडल अध्यक्ष डॉ. सदानंद राजवर्धन म्हणाले, ‘देशाच्या इतिहासात पहिल्यादांचा वनवासी भगिनी राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वनवासी बांधवांचे योगदान मोठे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती, जंगले यांचे खऱ्या अर्थाने संवर्धन केले. वनवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या चळवळीला मुर्मू यांच्या निवडीने बळ मिळणार आहे.’ यावेळी चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे , राजाराम परीट, प्रकाश ताटे, अमर साठे, रावसाहेब शिंदे, किसन खोत, रवींद्र पोवार, संतोष पाटील, धीरज उलपे, तानाजी रणदिवे, संजय जासूद, मनोज इंगळे, धीरज पाटील, रत्नदीप सावंत आदी उपस्थित होते.
इचलकरंजीत जल्लोष
इचलकरंजी : शहरात ताराराणी पक्ष आणि आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल जल्लोष साजरा केला. शिवतीर्थ ते मलाबादे चौक मार्गावर विजयी मिरवणूक काढत साखर वाटली. घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून रॅलीत सामील झालेल्या आदिवासी बांधवांनी शहराला भुरळ घातली. आमदार प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. ताराराणी पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी फासेपारधी समाजातील महिला, पुरुष, तसेच लहान मुले व वृद्ध जमा झाले होते. येथे पारंपरिक वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करत जल्लोष केला. शिवतीर्थ येथे ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवतीर्थपासून कॉ. मलाबादे चौकापर्यंत वाद्यांच्या गजरात विजयी मिरवणूक काढली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79705 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..