शासनाच्या स्‍थगिती आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासनाच्या स्‍थगिती आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा
शासनाच्या स्‍थगिती आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा

शासनाच्या स्‍थगिती आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा

sakal_logo
By

स्‍थगिती आदेशाची
अंमलबजावणी करा
संजयसिंह चव्‍हाण : स्‍थायी समिती बैठकीत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २१ : राज्य शासनाकडून मागील काही दिवसात विविध कामांच्या स्‍थगितीचे आदेश प्राप्‍त झाले आहेत. या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले. आज झालेल्या स्‍थायी समितीच्या बैठकीत या स्‍थगिती आदेशांवर चर्चा झाली. या बैठकीत शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम असलेल्या बर्की या गावासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याच्या प्रस्‍तावाला मान्यता दिली.

शासनाने दलित वस्‍ती निधी वितरण, जिल्‍हा नियोजन मंडळ तसेच ग्रामपंचायत विभागांच्या विविध हेडच्या निधी वितरणाला स्‍थगिती दिली आहे. हे स्‍थगिती आदेश ज्या तारखेपासून आले आहेत, त्या तारखेपासून संबंधित विभागांनी काय कारवाई केली, किती निधी उपलब्‍ध झाला, त्यातून कोणती कामे प्रस्‍तावित केली, यातील किती कामांना प्रशासकीय मान्यता दिली, निविदा प्रक्रिया राबवली का, कामाचे आदेश दिले का, किती कामांची बिले अदा केली, अशी माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत मेन राजाराम हायस्‍कूलसाठी देण्यात येणाऱ्या‍ निधीला मंजुरी दिली. स्‍थायी समितीकडे माणगाव ग्रामपंचायत व महावितरण यांच्यातील तक्रारीवर सुनावणी घेतली. मात्र महावितरणकडून सुनावणीसाठी पुढील तारीख मागितली. त्यामुळे तीनेश रुपये कॉस्‍ट लावल्याचे श्री. चव्‍हाण यांनी सांगितले. दरम्यान, कृषी समितीच्या बैठकीत सेंद्रिय शेती, सौर ऊर्जा पंप, पाचट अभियान यावर चर्चा झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79709 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top