
ओबीसी आरक्षणाबद्दव शिवसेनेतर्फे आनंदोत्सव
37687
उद्धव ठाकरेंमुळे ओबीसी आरक्षण
संजय पवार; दसरा चौकात शिवसैनिकांचा आनंदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले आहे. प, भाजप विनाकारण याचे श्रेय घेत आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे, असे शिवसेना जिल्हाप्रमूख संजय पवार यांनी सांगितले. आज दसरा चौकात शिवसैनिकांनी साखर-पेढे वाटून ओबीसी आरक्षणाचा आनंदोत्सव साजरा केला.
सर्वोच्च न्यायलयाने राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षणाला मान्यता दिली. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणानुसार उमेदवार दिले जातील. शिवसेनेने दसरा चौकात याचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पवार म्हणाले, ‘ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. मात्र, काहीही झाल ते माझ्यामुळे झालं, अशी म्हणण्याची भाजपची सवय आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडत जे बोलतो ते करुन दाखवतो हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करुन दाखवले.’ यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यानंतर वाहनधारक, नागरिक यांना ढोल ताशांच्या गजरात साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे, रवी चौगुले, युवासेना जिल्हाध्यक्ष मंजीत माने, विशाल देवकुळे, धनाजी यादव, सागर साळोखे, संतोष कांदेकर, स्मिता सावंत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
-
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79710 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..