
ठोकमानधन वेतन
ठोकमानधनावरील ३५०
कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत
कोल्हापूर, ता. २१ ः महापालिकेतील ३५० ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यातील पगार अद्याप मिळालेला नाही. मुळात पगार अतिशय कमी असतानाही तो वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. प्रशासन मात्र या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली नसल्याने पगार काढला नसल्याचा दावा करत आहे.
आस्थापना खर्च जास्त करता येत नसल्याने ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. वर्षभरासाठी ही नियुक्ती असून, कधीतरी कायम होण्याची अपेक्षा या कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळे कमी पगार असूनही ते ठोक मानधनावर काम करतात. या कर्मचाऱ्यांना जूनचा पगार १० तारखेपर्यंत होणे अपेक्षित होते. कायम कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन पाच जुलैला जमा केली. पण, या ठोक मानधनावरील कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याबाबत दुर्लक्ष झाले आहे. त्यातून हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79719 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..